घरदेश-विदेशAssembly Election 2022: यूपी अन् पंजाबमध्ये इतिहास बदलणार, उत्तराखंडमध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल

Assembly Election 2022: यूपी अन् पंजाबमध्ये इतिहास बदलणार, उत्तराखंडमध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल

Subscribe

दुसरीकडे मणिपूरमध्येही भाजपनं काँग्रेसवर चांगली आघाडी मिळवलीय. परंतु सर्वाधिक रोमांचक लढाई ही गोव्यात सुरू आहे. इथे सध्या भाजप आघाडीवर आहे. पण काँग्रेसही वेगानं पुढे सरकत आहे.

नवी दिल्लीः पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी यंदा मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमधून भाजप उत्तर प्रदेशमध्ये इतिहास रचताना दिसत आहे. योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वात भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनं इथे जवळपास बहुमताचा आकडा पार केल्याचं चित्र आहे. उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन करत असल्याचं दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसचा सुपडा साफ करत जवळपास विजय निश्चित केलाय.

दुसरीकडे मणिपूरमध्येही भाजपनं काँग्रेसवर चांगली आघाडी मिळवलीय. परंतु सर्वाधिक रोमांचक लढाई ही गोव्यात सुरू आहे. इथे सध्या भाजप आघाडीवर आहे. पण काँग्रेसही वेगानं पुढे सरकत आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ रेकॉर्ड बनवण्यास तयार आहे. 37 वर्षांनंतर पहिल्यांदाच सत्ताधारी पार्टीला पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार आहे. त्यापूर्वी वर्ष 1985 मध्ये काँग्रेस शेवटची सत्तेत परतली होती. भाजप आता 265 जागांवर आघाडीवर आहे. बहुमताच्या आकड्यांच्या भाजप खूप जवळ आहे. समाजवादी पार्टी 150 पर्यंत मजल मारताना दिसतेय, तर काँग्रेस आणि बीएसपीची फार वाईट स्थिती आहे.

उत्तराखंड

उत्तराखंडमध्येही पुन्हा एकदा भाजप सत्ता मिळवताना दिसत आहे. उत्तराखंड राज्यात कोणत्याही पक्षाला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी मिळत नाही. सध्याच्या कलांनुसार भाजपला 43 जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस 21 जागांवर पुढे आहे.

- Advertisement -

पंजाब

पंजाबमध्ये यंदा आपच्या झाडूनं काँग्रेसची साफसफाई करून टाकलीय. आप मोठ्या विजयाकडे वाटचाल करीत आहे. आपनं आतापर्यंत 87 जागांवर आघाडी मिळवलीय.

गोवा

निवडणुकीचा खरा रणसंग्राम हा गोव्यात पाहायला मिळत आहे. गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर होत आहे. सध्याच्या अंदाजानुसार, भाजपला आता 17 जागांवर आघाडी मिळालीय. काँग्रेस 16 जागांवर पुढे आहे. टीएमसी आणि आम आदमी पार्टीला 2-2 जागांवर आघाडी आहे.

मणिपूर

मणिपूरमध्ये सध्याच्या कलांनुसार एन. बीरेन सिंह पुन्हा एकदा भाजपची सत्ता मिळवण्याचा अंदाज आहे. भाजपला सध्या 21 जागांवर विजय मिळत असल्याचं चित्र आहे. म्हणजेच ते बहुमताच्या खूपच जवळ आहेत. काँग्रेसची गाडी पुन्हा एकदा मागेच राहिलीय.


हेही वाचाः Goa election result : पी चिदंबरम यांचा गोव्यात रात्रभर पहारा, कॉंग्रेस उमेदवारांचे हॉटेलमध्ये शिफ्टिंग

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -