घरAssembly Battle 2022Goa election result : पी चिदंबरम यांचा गोव्यात रात्रभर पहारा, कॉंग्रेस उमेदवारांचे...

Goa election result : पी चिदंबरम यांचा गोव्यात रात्रभर पहारा, कॉंग्रेस उमेदवारांचे हॉटेलमध्ये शिफ्टिंग

Subscribe

काँग्रेसनं सगळ्या उमेदवारांना गोव्यातील पणजी जवळ असलेल्या बम्बोलिम हॉटेलमध्ये ठेवलं होते. मात्र बुधवारी त्यांना मडगांव शहरातील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले. या रिसॉर्टचे मालक काँग्रेसचा एक उमेदवार आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. निकालापूर्वी काँग्रेसनं सावध पवित्रा घेतला आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले होते पंरतु त्यांना सरकार करता आले नाही. गेल्यावेळी झालेली चुकी यंदाच्या निवडणुकीमध्ये पुन्हा होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. गोवा निवडणूक प्रभारी पी चिदंबरम आणि डीके शिवकुमारसह वरिष्ठ नेत्यांनी गोव्यात ठाण मांडलं आहे. काँग्रेसने आपल्या उमेदवारांना रिसॉर्टमधून हॉटेलमध्ये शिफ्ट केले आहे. निकाल हाती येताच काँग्रेसकडून सरकार करण्यासाठी दावा करण्यात येऊ शकतो. जर आघाडी करायचे ठरलं तर त्यानुसार अपक्षांसोबत चर्चा सुरु करण्यात आली आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरम यांनी गोव्यातील निवडणूक निकालाच्या पूर्वसंध्येला गोवा विधानसभा निवडणूक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निकाल हाती आल्यावर त्वरित पक्ष आपल्या नेत्याचे नाव जाहीर करेल आणि सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात येईल. हा निर्णय मागील वेळी झालेल्याचा चुका सुधारण्याच्या दृष्टीकोणातून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

भाजपने काँग्रेसला फोडून सरकार स्थापन केलं

गोवा विधानसभा निवडणूक २०१७ मध्ये काँग्रेसनं दिग्वीजय यांना निवडणूक प्रभारी केले होते. निकाल आल्यानंतर काँग्रेस गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. परंतु सरकार करण्यामध्ये वेळ गेला. भाजप आणि काँग्रेसनं सरकार बनवण्याचा दावा केला आणि आमदारांना फोडणे सुरु केले. यामुळे काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळूनही सरकार करता आले नाही.

काँग्रेसच्या उमेदवाराचे हॉटेल

काँग्रेसनं सगळ्या उमेदवारांना गोव्यातील पणजी जवळ असलेल्या बम्बोलिम हॉटेलमध्ये ठेवलं होते. मात्र बुधवारी त्यांना मडगांव शहरातील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले. या रिसॉर्टचे मालक काँग्रेसचा एक उमेदवार आहे.

- Advertisement -

निकालानंतर राज्यपालांना भेटण्याची तयारी

काँग्रेसचे गोवा निवडणूक प्रभारी चिदंबरम यांनी जीएफपीच्या उमेदवारांसोबत बैठक केली. काँग्रेसच्या कर्नाटक पक्षाचे अध्यक्ष डी के शिवकुमार यामध्ये सहभागी होते. निकाल हाती आल्यानंतर आघाडीमधील नेत्याने नाव आणि राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांच्या समोर सरकार बनवण्याचा दावा करण्याबाबत निर्णय झाला आहे.

आघाडीसाठी आम आदमी पार्टीसोबत चर्चा

काँग्रेसने दावा केला आहे की, गोव्यात कोणत्याही पार्टीला स्पष्ट बहुमत मिळत नसल्यामुळे आघाडी करण्यासाठी आपशी चर्चा सुरु आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडनकर यांनी म्हटलं आहे की, आपचे नेत्यांची काँग्रेसबरोबर पहिल्यापासून चर्चा सुरु आहे. तसेच आपन यापूर्वी म्हटले आहे की, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला पाठिंबा देणार नाही. एमजीपीसुद्धा काँग्रेसला पाठींबा देईल. एमजीपीला भाजपने अनेकवेळा धोका दिला आहे. त्यांच्या नेत्यांना भाजपने कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे एमजीपी भाजपसोबत जाणार नाही.


हेही वाचा : Goa assembly results 2022 : गोवा कॉंग्रेसने मागितली राज्यपालांची वेळ, निकालाआधीच घडामोडींना वेग

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -