घरताज्या घडामोडीUttarakhand: लग्न सोहळा आटपून परतणारी कार दरीत कोसळली, १४ जणांचा मृत्यू, दोन...

Uttarakhand: लग्न सोहळा आटपून परतणारी कार दरीत कोसळली, १४ जणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Subscribe

उत्तराखंडमधील टनकपूरच्या पंचमुख धर्मशाळा येथील लग्न सोहळा आटपून परतत असताना गाडी दरी कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. टनकपूर-चंपावत हायवेला जोडलेला सुखीढांग-डांडामीनार रोडवर झालेल्या मॅक्स गाडीच्या दुर्घटनेत प्रवास करणाऱ्या १६ जणांपैकी १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर वाहनचालक आणि इतर व्यक्ती गंभीर जखमी झाले असून जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स गाडी यूके ०४, टीए- ४७१२मध्ये प्रवास करणारे सर्व लोक टनकपूरच्या पंचमुखी धर्मशाळामधील लग्न सोहळा आटपून घरी परतत होते. पण मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांच्या आसपास गाडीवरचे नियंत्रण सूटले आणि गाडी थेट खोल दरीत जाऊन कोसळली. गाडीतील सर्व प्रवासी ककनई रहिवाशी लक्ष्मण सिंह यांचा मुलगा मनोज सिंहच्या लग्नाला गेले होते. या दुर्घटनेमधील काही मृत व्यक्ती लक्ष्मण सिंह यांचे सख्खे नातेवाईक आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, १४ मृत व्यक्तीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या दुर्घटनेतील गंभीर जमखींवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. यामध्ये वाहन चालकाची प्रकृती अधिक गंभीर आहे. तसेच दुर्घटनेतील मृत व्यक्ती ककनईच्या डांडा आणि कठौती गावातील आहेत. दरम्यान गाडीच्या क्षमतेपेक्षा अधिक लोकं प्रवास करत असल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचे म्हटले जात आहे.


हेही वचा – Rajasthan Accident: राजस्थानमध्ये नवरदेवाला घेऊन जाणारी कार चंबल नदीत पडली; नवरदेवासह 9 जणांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -