घरताज्या घडामोडीRajasthan Accident: राजस्थानमध्ये नवरदेवाला घेऊन जाणारी कार चंबल नदीत पडली; नवरदेवासह 9...

Rajasthan Accident: राजस्थानमध्ये नवरदेवाला घेऊन जाणारी कार चंबल नदीत पडली; नवरदेवासह 9 जणांचा मृत्यू

Subscribe

राजस्थान कोटामध्ये आज, रविवारी नवरदेवासह नऊ जणांना घेऊन जाणारी कार चंबल नदीत पडली. या दुर्घटनेत नवरदेवासह सर्वांचा मृत्यू झाला आहे. कोटाच्या नयापुराजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलीस अधिकारी आणि नगरपालिका गोताखोरची टीमने दोन तास बचावकार्य केले. नदीत बुडालेल्या सर्व लोकांचे मृतदेह बाहेर टाकण्यात आले आहे. माहितीनुसार, चालक कार वेगाने चालवत होता. मग कारवरचे नियंत्रण सुटल्यामुळे थेट कार चंबल नदीत पडली. यावेळी प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने घटनेबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्या प्रवासाने सांगितले की, ‘कार वेगाने धावत होती.’

उज्जैनला जात होते वऱ्हाड

कोटा जिल्ह्यातील चौथ येथील बरवाडाचा रहिवासी नवरदेव अविनाश वाल्मिकीची आज लग्न होते. तो वऱ्हाड घेऊन उज्जैनला जात होता. वरातीच्या बसमध्ये ७० प्रवासी आणि कारमध्ये नवरदेवासह ९ जण शनिवारी रात्री दोन वाजता चौथ येथील बरवाडाहून रवाना झाले होते. मधेच रस्त्यात सर्व लोक एका दुकानावर चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यानंतर पुन्हा रवाना झाले तर बस पुढे निघून गेली. जेव्हा बस खूप पुढे निघून तेव्हा नवरदेवाच्या वडिलांना वाटले की, कार बसपासून खूप दूर आहे. त्यामुळे त्यांनी कारमध्ये प्रवास करत असलेल्या लोकांना फोन केला, तेव्हा कोणासोबत बोलणे झाले नाही. त्यामुळे त्यांनी बस थांबवून कार येण्याची वाट पाहू लागले.

- Advertisement -

यादरम्यान बचाव पथकाला कारमध्ये प्रवास करणाऱ्या रोशनच्या पाकिटमध्ये असलेल्या पत्राच्या आधारावर ओळख पटली. पोलिसांनी चौथ येथील बरवडामध्ये संपर्क केला, तेव्हा सर्व मृतांची ओळख पटली. पोलिसांनी नवरदेवाच्या वडिलांना फोन केला आणि घटनेबाबत माहिती दिली. माहितीनुसार, ही घटना सकाळी साडे पाच वाजता घडली होती.

वऱ्हाड राजस्थानच्या बरवाडाहून उज्जैनच्या भैरुनाला क्षेत्रमध्ये हरिजन परिसरात येत होते. स्थानिक लोकांनी सांगितले की, सुभाष कलोसिया रहिवाशीच्या तीन मुलीचे लग्न हरिजन परिसरात होते. एक वऱ्हाड ताल, रतलाम, दुसरे वऱ्हाड शामगढ, मंदसौर आणि तिसरे वऱ्हाड बरवाडा राजस्थानहून येणार होते. बरवाडावरून येणारा नवरदेव अविनाशसोबत सुभाष यांची सर्वात लहान मुलगी जयाचे लग्न होते. पण दुर्घटनेची माहिती मिळताच संपूर्ण लग्न सोहळ्यात शोककळा पसरली.

- Advertisement -

हेही वाचा – अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 29 वर्षीय महिलेला अटक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -