घरAssembly Battle 2022Modi in Manipur: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मणिपूर दौरा, इंफाळमध्ये जनतेला संबोधित...

Modi in Manipur: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मणिपूर दौरा, इंफाळमध्ये जनतेला संबोधित करणार

Subscribe

मणिपूरमध्ये विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते आपापल्या पद्धतीने प्रचार करत आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि आता पंजाबनंतर मणिपूरमध्ये निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(मंगळवार) मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या दौऱ्यात मोदी इन्फाळमधील जनतेला संबोधित करणार आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी होणाऱ्या दोन टप्प्यातील निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ मंत्री आणि पक्ष कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. मात्र, मोदींच्या दौऱ्यावर मणिपूरमधील सहा प्रतिबंधित सशस्त्र गटांच्या समन्वय समितीने बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. कोरकॉमने केलेल्या वक्तव्यानुसार, दुपारी १ वाजल्यापासून पंतप्रधान राज्यातून निघेपर्यंत संपूर्ण ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

आपात्कालीन सेवा आणि मीडिया कर्मचाऱ्यांना बहिष्काराच्या कक्षेतून सूट देण्यात आली आहे. तर लोकांना पीएम मोदींकडून संबोधित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये बाहेर पडू नये किंवा सहभागी होऊ नये, असं सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

मणिपूरमध्ये ६० जागांसाठी होणार निवडणूक

मणिपूर राज्यात विधानसभेच्या ६० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूका दोन टप्प्यांमध्ये होणार आहेत. मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा २७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. तर दुसरा टप्पा ३ मार्च रोजी पार पडणार आहे. तसेच १० मार्चला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नॅशनल पीपल पार्टी आणि इतर सदस्यांच्या पाठिंब्याने एन बिरेंद्र सिंह यांना मुख्यमंत्री केले होते. सध्या राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे ही सत्ता टिकवण्यासाठी आणि आपला गढ कायम ठेवण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे.


हेही वाचा : viral video : PSL चे वाद थांबेना ! विकेट घेतली अन् लगावली कानशिलात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -