घरदेश-विदेशAtique Ahmad Al Queda : अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार, अल-कायदाची...

Atique Ahmad Al Queda : अतिक आणि अश्रफच्या हत्येचा बदला घेणार, अल-कायदाची धमकी

Subscribe

नवी दिल्ली : माफिया अतिक अहमद (Gangster Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf) यांच्या हत्येप्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. अल-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेने या हत्यांचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. यामुळे आता तपास यंत्रणा सतर्क झाली असून पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

उमेश पाल यांचे 2006मध्ये बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्यामुळे माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांविरुद्ध 2007मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी या दोघांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने अटक केली होती. प्रयागराजमध्ये 15 एप्रिल 2023 रोजी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विन रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयाच्या बाहेर पत्रकार बनून आलेल्या तीन हल्लेखोरांनी दोघा भावांवर गोळीबार केला. त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित तिन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. अरुण मौर्य, सनी आणि लवलेश तिवारी अशी त्यांची नावे आहेत. याच्या दोन दिवस आधीच झांसी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मारला गेला होता.

- Advertisement -

हेही वाचा – पाटण्यामध्ये नमाजानंतर ‘अतिक अहमद अमर रहे’ च्या घोषणा, पोलीस सतर्क

अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटने (AQIS) सात पानी मॅगझिन जारी करत गँगस्टर अतिकच्या हत्येवरून भारतात दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे. आपल्या ईद संदेशात अल-कायदाने भारताचा बदला घेणार असल्याचे या मॅगझिनमध्ये म्हटले आहे. याशिवाय या दहशतवादी संघटनेने (Terror group) अतिक आणि अशरफ यांचा ‘शहीद’ असा उल्लेख केला आहे. अल-कायदाने या मॅगझिनमध्ये मुस्लिमांना ‘मुक्त’ करणार असल्याचेही म्हटले आहे. या धमकीनंतर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील संवेदनशील भागांसह प्रयागराजमध्ये सुरक्षा अधिक मजबूत केली आहे.

- Advertisement -

बिहारमध्ये माफियांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
बिहारच्या पाटणामध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर काही लोकांनी अतिक अहमदच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. ‘अतिक अहमद अमर रहें’च्या घोषणा देताना ‘मोदी-योगी मुर्दाबाद’च्या घोषणाही काही लोकांकडून देण्यात आल्या. ही घटना पाटणा स्टेशनजवळील जामा मशिदीच्या जवळ घडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -