घरमहाराष्ट्रCovid-19 : कोरोनामुळे राज्यात पाच रुग्णांचा मृत्यू; मुंबईतील दोघांचा समावेश

Covid-19 : कोरोनामुळे राज्यात पाच रुग्णांचा मृत्यू; मुंबईतील दोघांचा समावेश

Subscribe

मुंबई : राज्यात व मुंबईत एकीकडे कोरोना (Covid-19) रुग्ण संख्या कमी-जास्त होत असताना दुसरीकडे कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची नोंदही अधून-मधून होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाबाधित पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये मुंबईतील दोन रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यँत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ४९७ झाली आहे. तर मुंबईत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १९ हजार ७५८ झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत पुन्हा एकदा कोरोना आपले हातपाय पसरू पाहत आहे. सहव्याधी, वयोवृद्ध व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधित ९९३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८१ लाख ६० हजार ४९९ झाली आहे. तसेच, राज्यात दिवसभरात १,१४७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात ८० लाख ६ हजार ३२ रुग्ण मुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या ५,९७० सक्रिय रुग्ण आहेत.

त्याचप्रमाणे, मुंबईत शुक्रवारी कोरोनाबाधित २२६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६१ लाख ५६९ झाली आहे. तर, दिवसभरात कोरोनाबाधित २८२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ११ लाख ४० हजार ३४५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या १,४६६ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

केंद्राचे आठ राज्यांवर लक्ष
देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्रासह आठ राज्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. केंद्राने या राज्यांना संसर्ग दर आणि प्रति 100 चाचण्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. महामारी अद्याप संपलेली नाही (Covid isn’t over). अशा परिस्थितीत प्रत्येक स्तरावर सतर्क राहण्याची गरज आहे. आता आपल्याकडून एखादी जरी चूक झाली तर, त्याचा फटका सहन करावा लागेल, असा इशाराही केंद्र सरकारने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -