घरताज्या घडामोडीAttack On Owaisi : हिंदूंविरोधी वक्तव्यामुळे ओवैसींवर गोळीबार केला, पोलीस चौकशीत आरोपीचा...

Attack On Owaisi : हिंदूंविरोधी वक्तव्यामुळे ओवैसींवर गोळीबार केला, पोलीस चौकशीत आरोपीचा जबाब

Subscribe

टोल प्लाझाचे व्हिडिओ फुटेज स्कॅन करण्यात आले आणि या प्रकरणी सचिन नावाच्या युवकाला अटक करण्यात आली आहे. हा युवक गौतमबुद्ध नगर येथील बादलपूर भागातील रहिवासी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.

ओवेसींच्या हिंदुद्वेषी वक्तव्यामुळे दुखावल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला असे पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील हापु़ड जिल्ह्यात गुरुवारी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीनी (एआयएमआयएम)चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला होता. परंतु ओवैसींसह कोणालाही इजा झाली नाही. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरु केली आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांना सांगितले की, ओवैसींवर हिंदुविरोधी वक्तव्याने दुखावल्यामुळे गोळीबार केला.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिममीनी (एआयएमआयएम)चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी गुरुवारी संध्याकाळी मेरठच्या किथोर भागात झालेल्या सभेनंतर दिल्लीच्या दिशेने प्रवास करत होते. यादरम्यान हापुड जिल्ह्यात पिलखुवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या छिजारसी टोल प्लाझाजवळ सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास दोन तरुणांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्याबाबतची माहिती ओवैसी यांनी ट्विट करुन दिली आहे. पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, ओवैसी यांच्या ट्विटवरून पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर त्वरित कारवाई करत टोल प्लाझाचे व्हिडिओ फुटेज स्कॅन करण्यात आले आणि या प्रकरणी सचिन नावाच्या युवकाला अटक करण्यात आली आहे. हा युवक गौतमबुद्ध नगर येथील बादलपूर भागातील रहिवासी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

आरोपी गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील दुरई गावचा रहिवासी आहे. सचिन नावाच्या या तरुणाला हे हत्यार कसे मिळाले याचा तपास पोलीस करत आहेत. निवडणूक प्रचार आटोपल्यानंतर परतत असताना मसुरी भागातील टोल प्लाझा येथे असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार झाल्यानंतर दोन तरुणांची नावे आणि व्हिडिओ फुटेज समोर आले होते. प्राथमिक तपासानंतर हापूर पोलिसांच्या कारवाईत पकडलेला सचिन हा बदलपूरच्या कोतवाली भागातील दुराई गावचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती नाही. एसीपी ग्रेटर नोएडा सेकंड योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, हापूर पोलिसांकडून या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली जात आहे. तरुणांच्या संपर्कात आलेल्यांचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Video : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर टोल नाक्यावर चार राऊंडर फायर

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -