घरमहाराष्ट्रनाशिकबिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे जेरबंद

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे जेरबंद

Subscribe

इगतपुरी तालुक्यातील ३ तर त्र्यंबकचे दोघांसह ७ आरोपी घोटीजवळ अटकेत

इगतपुरी : शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या ७ आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीमध्ये इगतपुरी तालुक्यातील ३, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २ जणांचा समावेश असून एकूण ७ आरोपी आहेत. यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. अशाच एका घटनेत २०१८ मध्ये इगतपुरी तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही मोठ्या हिमतीने काही आरोपींना जरेबंद केले होते.

ह्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, १९ जानेवारीला वनपरिक्षेत्र वाशाळामधील मौजे वाशाळा गावाच्या परिसरात वन्यप्राणी बिबट्याच्या कातड्याचा व्यापार होत असल्याच्या गुप्त बातमीवरून शहापूर वनविभागाने सापळा रचला. ह्या सापळ्यात शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वन्य प्राणीमित्र संतोष जगदाळे यांनी बनावट ग्राहक बनून आरोपींना संपर्क केला. आरोपींनी भेटण्याचे ठिकाण वाशाळा इथून बदलून इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी मंदिर परिसरात भेटण्याचे ठरविले. तेथे त्यांना बिबट वन्य प्राण्याचे कातड्याची मोबाईलवर व्हिडिओ दाखवून त्याचा व्यवहार करायचा असल्याचे सांगितले. परंतु त्या दिवशी आरोपींनी व्यवहार केला नाही.

- Advertisement -

त्यानुसार १९ जानेवारीपासून गुन्ह्यात सहभागी आरोपींनी बनावट ग्राहकाला मोबाईलवर कॉल करून बिबट वन्य प्राणी कातड्याची विक्री करण्याचे ठरविले. त्यानुसार काल २ फेब्रुवारीला बिबट वन्य प्राण्याचे व्यवहारासाठी पहिल्यांदा घाटनदेवी मंदिर परिसरात ठरले. मात्र यानंतर लगेच ठिकाण बदलून इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत ठरले. त्यानुसार शहापूरचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाशाळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल गोदडे, खर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख, शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांच्यासह कर्मचार्‍यांनी संयुक्त सापळा रचला.

बनावट ग्राहक बनून आरोपी समोर उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत गेले असता बिबट वन्य प्राणीचे कातड्याचा व्यवहार करताना ७ आरोपी आढळले. त्यांच्याकडे बिबट वन्य प्राण्यांचे कातडे नग १ आणि ४ मोटरसायकली या मुद्देमालासह त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -