घरताज्या घडामोडीAIIMSनंतर ICMRच्या वेबसाइटवर हॅकर्सकडून हल्ल्याचा प्रयत्न, 24 तासांत 6000 वेळा अटॅक

AIIMSनंतर ICMRच्या वेबसाइटवर हॅकर्सकडून हल्ल्याचा प्रयत्न, 24 तासांत 6000 वेळा अटॅक

Subscribe

AIIMSनंतर आता ICMRच्या वेबसाइटवर हॅकर्सकडून हल्ला करण्यास सुरुवात झाली आहे. 24 तासांत 6000 वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून करण्यात आला आहे. एम्सनंतर सायबर हल्लेखोरांनी आता भारतातील इतर आरोग्य आणि संशोधन संस्थांच्या वेबसाइट्स आणि रुग्ण माहिती प्रणालींना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.

30 नोव्हेंबर रोजी सायबर हॅकर्सनी ICMR म्हणजे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वेबसाइटवर 24 तासांच्या कालावधीत सहा हजारांहून अधिक वेळा अटॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ICMRच्या वेबसाइटवर हाँगकाँग-आधारित ब्लॅकलिस्टेड आयपी अॅड्रेस 103.152.220.133 वरून करण्यात आले होते. परंतु सायबर हल्लेखोरांना रोखण्यात आले. मात्र, ते त्यांच्या नापाक योजनांमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत.

- Advertisement -

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एनआयसीने सरकारी संस्थांना फायरवॉल अपडेट ठेवण्यास सांगितले आहे. सरकारी संस्थांना ऑपरेटिंग सिस्टिमचा सिक्युरिटी पॅच अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 2020 पासून आरोग्य संस्थेच्या वेबसाइटवर सायबर अटॅक वाढले आहेत.


हेही वाचा : अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी नेटवर्कचे अस्तित्व चिंताजनक, भारताचे

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -