घरदेश-विदेशRam Temple : रामाने वनवास भोगला, पत्नी सीतेच्या सुटकेसाठी युद्ध केले; पण...

Ram Temple : रामाने वनवास भोगला, पत्नी सीतेच्या सुटकेसाठी युद्ध केले; पण मोदींनी…; सुब्रमण्यम स्वामींची टीका

Subscribe

नवी दिल्ली : अयोध्येतील (Ayodhya) बहुप्रतिक्षित राम मंदिराचे (Ram temple) लोकार्पण 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. नव्या संसद भवनाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच केल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून टीका झाली होती. पण आता राम मंदिराचे उदघाटन करण्यावरून भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ट्वीट करत मोदींवर टीका केली आहे. (Ayodhya Ram Temple : Rama suffered exile, fought for the release of his wife Sita; But Modi abandoned his wife; Commentary by Subramaniam Swamy)

हेही वाचा – Robert Vadra यांच्या अडचणी वाढल्या, ईडीच्या आणखी एका प्रकरणात नाव समोर

- Advertisement -

अयोध्येतील राम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा पूजेच्या कार्यक्रमात मोदींना सामील होण्यास आम्ही रामभक्त कसे काय परवानगी देऊ शकतो? असा सवाल करत सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करताना म्हटले की, जेव्हा श्री राम यांनी जवळजवळ दीड दशके व्यतीत केली आणि पत्नी सीतेला वाचवण्यासाठी युद्ध पुकारले होते. पण मोदी पत्नीचा त्याग करण्यासाठी ओळखले जातात, तरीही ते पूजा कशी करणार? असा सवालही सुब्रमण्यम स्वामी यांनी विचारला आहे. 

- Advertisement -

सुब्रमण्यम स्वामींच्या पोस्टवर अनेकांचे टीकास्त्र 

सुब्रमण्यम स्वामी हे गेल्या काही काळापासून भाजपावर आणि विशेषतः पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांवर सातत्याने टीका करताना दिसतात. नोटबंदीपासून ते करोना काळात घेतलेल्या काही निर्णयांवर त्यांनी टीका केलेली आहे. आता राम मंदिराच्या उदघाटनावरून केलेल्या टीकेमुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी राग व्यक्त केला आहे. एक युझर्सने म्हटले की, तुमची मंत्री म्हणून नियुक्ती न करण्याबद्दल मी वाजपेयी आणि मोदींच्या राजकीय जाणकारांचे कौतुक करतो. त्यावेळी मी निराश झालो होतो, पण आता मला समजले की, त्यांच्याकडे व्यक्तींचे मूल्यांकन करण्याची क्षमता आहे आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या युझर्सने म्हटले की, सर, मोदींशी तुमचे कोणतेही राजकीय मतभेद असले तरी, मी तुम्हाला ते बाजूला ठेवून राम मंदिर उद्घाटनाचा आनंद सोहळा स्वीकारण्याची विनंती करतो. हिंदूंचे बहुप्रतिक्षित स्वप्न शतकानुशतके प्रत्यक्षात साकार झाले हे आश्चर्यकारक नाही का? असा सवाल केला आहे. 

हेही वाचा – Bharat Nyay Yatra: राहुल गांधी मुंबईत पायी चालणार; उद्धव ठाकरे, शरद पवार होणार का सहभागी?

आठ हजार जणांना उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण

दरम्यान, 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्यामुळे संपूर्ण अयोध्येत लगबग सुरू आहे. सुमारे आठ हजार जणांना उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व सरसंघचालक मोहन भागवत हे तिघे प्रमुख अतिथी असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -