घरताज्या घडामोडीअरे व्वा! आता रेल्वेच प्रवाशांचे सामान घरापासून ट्रेनपर्यंत पोहोचवणार

अरे व्वा! आता रेल्वेच प्रवाशांचे सामान घरापासून ट्रेनपर्यंत पोहोचवणार

Subscribe

अनेकांना रेल्वे प्रवास करताना त्यांचे सामान घरापासून ट्रेनपर्यंत घेऊन जाण्यास खूप कंटाळा येतो. तर काहींना त्यांचा त्रास देखील होतो. पण आता भारतीय रेल्वे प्रवाशांचे सामान घरापासून ट्रेनपर्यंत पोहोचवणार आहे. यासाठी भारतीय ‘रेल्वे बॅग्स ऑन व्हील्स’ सेवा सुरू करणार आहे. अशा प्रकरणाची पहिल्यांच भारतीय रेल्वे सेवा सुरू करणार आहे. विना-भाडे महसूल अधिग्रहण योजनेअंतर्गत ही सेवा सुरू केली जाईल. यामुळे आता प्रवाशांचा ट्रेनपर्यंत सामान पोहोचवण्याचा ताण दूर होणार आहे.

माहितीनुसार, ‘बॅग्स ऑन व्हील्स’ ही सेवा सध्या नवी दिल्ली स्टेशन, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन, दिल्ली सराय रोहिल्ला रेल्वे स्टेश, गाझियाबाद रेल्वे स्टेशन, दिल्ली कंन्टोन्मेंट रेल्वे स्टेशन आणि गुरुग्राम रेल्वे स्टेशन या स्टेशनवर उपलब्ध आहे. या सेवेच्या अंतर्गत प्रवाशांना जागेवर माल घेऊन जाण्याच्या समस्येपासून मुक्तता होणार आहे.

- Advertisement -

‘रेल्वे नव नवीन उपाययोजनांच्या माध्यमातून महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या सेवेसाठी प्रवाशांना रेल्वेच्या BOW (Bags On Wheels) यावर जाऊ बुकिंग करून सर्व माहिती द्यावी लागेल’, असे यासंदर्भात अधिक माहिती देताना उत्तर आणि उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांनी सांगितले.

या माहितीच्या प्रवाशांचे सामान घरापासून स्टेशनपर्यंत आणि स्टेशपासून घरी किंवा कोचमध्ये नेले जाईल. तसेच प्रवाशांचे सामान त्यांच्या सीटपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रेल्वेची असणार आहे. कमी पैशात या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग लोक आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास करणे सोयीस्कर होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -