घरदेश-विदेशSheikh Hasina PM of Bangladesh : बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचे...

Sheikh Hasina PM of Bangladesh : बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचे सरकार, पाचव्यांदा होणार पंतप्रधान

Subscribe

Sheikh Hasina : बांगलादेशमध्ये शेख हसीना (Sheikh Hasina) पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. रविवार झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने (Awami League) 300 जागांपैकी दोनतृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना पाचव्यांदा पतंप्रधान होणार आहेत. 2009 पासून त्या पंतप्रधान आहेत. याआधी 1991 ते 1996 या काळात शेख हसीना या पंतप्रधान होत्या.

आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या अवामी लीग पक्षाने (Awami League party) ने 300 संसदीय जागांपैकी 224 जागा जिंकल्या आहेत. बांगलादेश राष्ट्रीय पक्षाने 4 जागा जिंकल्या आहेत. अपक्षांनी 62 जागा जिंकल्या आहेत तर इतरांनी एक जागा जिंकली आहे. दरम्यान, उर्वरित 2 जागांसाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा… NZ vs BAN : बांग्लादेशने तगड्या न्यूझीलंडला त्यांच्याच देशात चारली धूळ; मिळवला ऐतिहासिक विजय

लोकसभा गोपालगंज-3मधून शेख हसीना या जास्त मताने जिंकल्या आहेत. त्यांना 2,49,965 मते मिळाली. तर त्यांचे विरोधक एम. निजामउद्दीन लष्कर यांना अवघी 469 मते मिळाली. शेख हसीना 1986 नंतर आठव्यांदा गोपालगंज-3 या मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आहेत. यासोबतच शेख हसीना यांनी बांगलादेशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रमही केला आहे. 2009 पासून त्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत.

- Advertisement -

2018 मध्ये बांगलादेशात झालेल्या निवडणुकीत 80 टक्के मतदान झाले होते. मात्र यावेळी सार्वत्रिक निवडणुकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. परिणामी निवडणुकीत केवळ 40 टक्के मतदान झाले. कमी मतदान हा त्यांचा बहिष्कार यशस्वी झाल्याचा पुरावा असल्याचा दावा बीएनपीच्या नेत्यांनी केला आहे.

निवडणुकीपूर्वी बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या होत्या. रविवारीही मतदानादरम्यान देशभरात 18 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून त्यापैकी 10 मतदान केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे.

माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश पार्टीच्या (Bangladesh Nationalist Party) (BNP) नेत्यांनी या निवडणुका फसव्या असल्याचे म्हटले आहे. BNP ने 2018 मध्ये पक्षाचे निवडणूक लढवली. यावेळी पुन्हा BNP ने बहिष्कार टाकला होता. त्यासोबतच 15 राजकीय पक्षांनीही बहिष्कार टाकला होता. BNP ने 48 तसांचा संपही अयोजित केला होता. ज्यामध्ये त्यांनी जनतेला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. कमी मतदान हा त्यांचा बहिष्कार यशस्वी झाल्याचा पुरावा असल्याचा दावा BNP च्या नेत्यांनी केला आहे.

हेही वाचा… बांग्लादेशकडून विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात; शांतो आणि मेहदीची शानदार फलंदाजी

यावेळी लोकांमध्ये मतदानासाठी फारसा उत्साह नसल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या नाहीत. मतदानाला सुरूवात झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका सिटी कॉलेजच्या मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सायमा वाजेदही होती. शेख हसीना यांनी BNP आणि जमात-ए-इस्लामीवर लोकशाहीवर विश्वास नसल्याचा आरोप केला होता. त्यांनी भारताची स्तुती करत भारताला विश्वासू मित्र म्हटले होते.

या निवडणुकीत 436 अपक्ष उमेदवारांशिवाय 27 राजकीय पक्षांचे 1500 हून अधिक उमेदवार रिंगणात होते. माजी निवडणूक आयुक्त ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) सखावत हुसेन यांनी गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत ही निवडणूक अनोखी असल्याचे वर्णन केले.

यावेळी अपक्ष आणि डमी उमेदवारांच्या नावावर एकाच पक्षाच्या उमेदवारांमध्ये निवडणूक होत असल्याचे सखावत म्हणाले. त्यामुळे मतदारांची उत्सुकता कमी आहे. ते म्हणाले, हे एक अनोखे मॉडेल आहे. कोण बाजी मारणार हे सर्वांना माहिती आहे, विरोधी पक्षात कोण असणार हा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -