घरमनोरंजनश्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आलिया-रणबीरला निमंत्रण मिळाल्याने युझर्स नाराज

श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आलिया-रणबीरला निमंत्रण मिळाल्याने युझर्स नाराज

Subscribe

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 22 जानेवारीला भव्य दिव्य असा उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या दिवसाची सर्वच भारतीय मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातील लाखो हिंदू अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यात देशातील राजकारणी, क्रिकेटर, कलाविश्वातील दिग्गजांना आमंत्रण देण्यात आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना देखील या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आलिया-रणबीरला आमंत्रण

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सध्या सोशल मीडियावर रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दिसतंय की, “आलिया आणि रणबीरला श्री राम मंदिराच्या अभिषेकचे निमंत्रण मिळाले आहे. हे फोटो शेअर करत मानव मंगलानी यांनी लिहिलंय की, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, आरएसएस कोकणचे प्रांतीय प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांच्याहस्ते श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.”

- Advertisement -

आलिया-रणबीरला निमंत्रण मिळाल्याने युझर्स नाराज

श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आलिया आणि रणबीरला निमंत्रण दिल्याने युझर्स नाराज झाले आहेत. या फोटोखाली ते अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकाने कमेंट करुन लिहिलंय की, यांना निमंत्रण देण्याची काय गरज आहे. जे मंदिरासाठी लढले त्यांना निमंत्रण द्या. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “जे खरे राम भक्त आहेत त्यांना निमंत्रण नाही. पण या कलारांना निमंत्रण आहे.” तर तिसऱ्याने लिहिलंय, “हा तर फक्त पब्लिसिटी स्टंट आहे.”

‘हे’ कलाकारही राहणार उपस्थित

आलिया-रणबीर व्यतिरिक्त बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. या यादीत अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, सनी देओल, अजय देवगन यांसारखे अनेक कलाकार असतील.

- Advertisement -

हेही वाचा :

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या-अभिषेक कबड्डीचा सामना पाहायला जोडीने हजर; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -