घरताज्या घडामोडीव्याजदर वाढीची महाबँकेकडून घोषणा, कर्जधारकांच्या खिशावरचा बोजा वाढणार

व्याजदर वाढीची महाबँकेकडून घोषणा, कर्जधारकांच्या खिशावरचा बोजा वाढणार

Subscribe

महाबँकेकडून व्याजदर वाढीची मोठी घोषणा करण्यात आली आहे. परंतु या घोषणेमुळे किंवा निर्णयामुळे कर्जधारकांच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता ईएमआयपोटी जास्त रक्कम भरावी लागणार आहे. कर्जावरील नवीन व्याजदर १५ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांना ईएमआयचा भुर्दंड भरावा लागणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राने काल(सोमवार) कॉस्ट ऑफ लेंडिग रेटमध्ये १० बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. परिणामी बेंचमार्क एका वर्षासाठी १० बेसिस पॉईंट्सने वाढून ८.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या विविध कालावधींसाठीच्या एमसीएलआरमध्ये वाढ झाल्यामुळे जवळपास सर्व प्रकारच्या कर्जदारांच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज घेणार्‍या ग्राहकांचा समावेश आहे.

- Advertisement -

देशातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीसह LIC इन्फोसिसचे संस्थापक नारायणमुर्ती आणि त्यांच्या कुटुंबाचे काही सेकंदातच मोठे नुकसान झाले आहे.

नारायण मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबापेक्षा एलआयसीची इन्फोसिसमध्ये जास्त भागिदारी आहे. इन्फोसिसच्या खराब आकडेवारीमुळे आज कंपनीचे शेअर्स १० टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. इन्फोसिस शेअर्सच्या घसरणीमुळे एलआयसीला सर्वात मोठा तोटा झाला आहे. डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस, एलआयसीकडे २८,१३,८५,२६७ शेअर्स किंवा आयटी फर्ममध्ये ७.७१ टक्के हिस्सा होता. हे मूल्य गुरुवारच्या बाजार बंदवेळी ३९,०७३ कोटी रुपये नोंदवण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : अतिक-अशरफच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगींचे मोठे वक्तव्य; युपीत आता माफिया…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -