घरदेश-विदेशरोडरोमियोंकडून पाठलाग; अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशात अपघाती मृत्यू

रोडरोमियोंकडून पाठलाग; अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशात अपघाती मृत्यू

Subscribe

अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमध्ये बुलेटस्वारांनी केलेल्या छेडछाड आणि पाठलागात मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात बुलेटस्वारांकडून झालेल्या छेडछाड आणि पाठलागात अपघाती मृत्यू झाला आहे. सुदीक्षा भाटी असं या तरुणीचं नाव आहे. तिला तिच्या उच्च शिक्षणासाठी एचसीएलकडून तब्बल ३.८० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती. ती अमेरिकेतील बॅब्सन कॉलेजमध्ये शिकत होती. ती नुकतीच काही दिवस सुट्टीवर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदीक्षा भाटी तिच्या काकांसोबत स्कूटीवरुन औरंगाबादला मामाकडे जात होती. त्यावेळी बुलेटवर असलेल्या दोघांनी तिचा पाठलाग केला. बुलेटवर असलेल्या तरुणाने समोर येत अचानक ब्रेक लावला आणि सुदीक्षाची स्कूटी बुलेटला जोरदार धडकली. या अपघातात सुदीक्षा स्कूटीवरुन पडली. गंभीर जखमी झाल्याने तिने जागीच प्राण सोडले. पोलिसांनी अज्ञात दुचाकीचालकांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला.

- Advertisement -

काकांनी सांगितली अपघाताची संपूर्ण कहाणी

घटनेविषयी सुदीक्षाच्या काकांनी सांगितलं की, “आम्ही स्कूटीवरून जात होतो. चौक ओलांडताच बुलंदशहर गाव आहे, तिथे एक बुलेटस्वार होता, जो अनेकवेळा आम्हाला आव्हरटेक करत होता. आम्ही आमची स्कूटीचा वेग थोडा कमी केला. मग त्याने बुलेट स्टंट करण्यास सुरवात केली. तो पुढे गेला आणि अचानक आमच्या समोर ब्रेक मारला. आमची स्कूटी बुलेटवर धडकली आणि मी पडलो. माझी भाची डोक्यावर पडली. बुलेटला मी ओळखलं नाही. बुलेटवर जाट लिहिलं होतं. घटनेनंतर तो निघून गेला.

सुदीक्षाचा भाऊ याबद्दल म्हणाला, आमचा वेग ताशी ३० असावा. आम्ही जोरात ब्रेक मारला. समोर एक बुलेट होती जिच्या समोर जाट लिहिलेले होते. ती UP-13 दुचाकी होती. आपत्कालीन परिस्थितीत नंबर लक्षात ठेवू शकलो नाही. दीदी मागे पडली आणि मी खाली पडलो पण मला इजा झाली नाही. सुदीक्षाच्या घरी आणखी एक व्यक्ती म्हणाली, अर्ध्या तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. ही घटना लपविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

- Advertisement -

मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवली शिष्यवृत्ती

सुदीक्षा २० ऑगस्ट रोजी अमेरिकेला परत जाणार होती. पण त्याआधीच अपघातात तिचा मृत्यू झाला. गौतम बुद्ध नगरच्या दादरीमध्ये राहणारी सुदीक्षा अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिचे वडील ढाबा चालवतात. सुदीक्षाने पाचवीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतलं. यानंतर प्रवेश परीक्षेद्वारे तिचा प्रवेश एचसीएलचे मालक शिव नदार यांच्या सिकंदराबादमधील शाळेत झाला. सुदीक्षा बारावी परीक्षेत बुलंदशहरात अव्वल आली होती. यानंतर उच्चशिक्षणासाठी तिची निवड अमेरिकेतील कॉलेजमध्ये झाली. शिक्षणासाठी सुदीक्षाला एचसीएलकडून ३.८० कोटी रुपयांची शिष्यवृत्तीही देण्यात आली होती.


हेही वाचा – ‘या’ मास्कमुळे पसरतो कोरोना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -