घरताज्या घडामोडीदिल्लीत भर पावसात रंगला बीटिंग द रिट्रीट, प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता

दिल्लीत भर पावसात रंगला बीटिंग द रिट्रीट, प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता

Subscribe

देशाची राजधानी दिल्लीतील विजय चौकात ‘बीटिंग द रिट्रीट’ या सोहळ्याने आज प्रजासत्ताक दिनाच्या विविध कार्यक्रमांची सांगता झाली. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती. बीटिंग द रिट्रीट हा सोहळा आज भर पावसात रंगला. यादरम्यान, देशातील सर्वात मोठा ड्रोन शो देखील झाला, ज्यामध्ये 3 हजार 500 स्वदेशी ड्रोनचा वापर करण्यात आला. या माध्यमातून आकाशात विविध कलाकृती सादर करण्यात आल्या.

- Advertisement -

विजय चौकात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमादरम्यान प्रथमच उत्तर आणि दक्षिण ब्लॉकच्या समोरील भागात रंगीबेरंगी दिव्यांच्या माध्यमातून विविध आकृत्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ट्यून हे यंदाच्या सोहळ्याचे खास आकर्षण होते. पावसाच्या दरम्यान, दिल्लीच्या विजय चौकातील या सोहळ्यात लष्करी बँडने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या सोहळ्यात नौदलाच्या बँडने ‘एकला चलो रे’ची धून वाजवली होती.

- Advertisement -

संरक्षण मंत्रालयानुसार, लष्कर, नौदल, हवाई दल आणि राज्य पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) यांच्या संगीत बँडद्वारे 29 मनमोहक आणि पाय-टॅपिंग भारतीय संगीत ध्वनीचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. बीटिंग द रिट्रीट समारंभाची सुरुवात ही 1950 च्या दशकाच्या सुरुवातीला करण्यात आली. जेव्हा भारतीय सैन्याच्या मेजर रॉबर्ट्सने मास बँडद्वारे प्रदर्शनाचा अनोखा समारंभ सुरू केला.

जेव्हा सैन्याने लढाई थांबवली, शस्त्रे म्यान केली आणि युद्धभूमीतून माघार घेतली तेव्हा रिट्रीटच्या आवाजात सूर्यास्ताच्या वेळी सैनिक हे छावण्यांमध्ये परतले. त्या आधारावर ही शतकानुशतके जुनी लष्करी परंपरा बीटिंग रिट्रीटच्या माध्यमातून बदलण्यात आली.


हेही वाचा : ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन, पोलीस अधिकाऱ्याला अटक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -