घरताज्या घडामोडीओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन, पोलीस अधिकाऱ्याला अटक

ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन, पोलीस अधिकाऱ्याला अटक

Subscribe

ओडिशाचे आरोग्यमंत्री आणि बिजू जनता दलचे ज्येष्ठ नेते नबा दास यांचं उपचारादरम्यान निधन झालं आहे. के ६० वर्षांचे होते. त्यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केला होता. त्या पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. दास यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर त्यांना भुवनेश्वरच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

आरोग्य मंत्री नबा दास हे एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रजराजनगरमध्ये आले होते. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तेव्हा कोणीतरी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर एक पोलीस तिथून पळून जात असल्याचं दिसून आलं. हा हल्ला परफेक्ट प्लॅनिंगने करण्यात आला आहे. नबा दास यांच्या अगदी जवळून गोळी झाडण्यात आली. या हल्ल्याने आरोग्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

या घटनेनंतर सत्ताधारी पक्ष बीजदच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते निषेधार्थ संपावर बसले आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या आरोग्यमंत्र्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच नवीन पटनायक यांनी मंत्री नबा दास यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र शोक आणि दुःख व्यक्त केले आहे.

- Advertisement -

कोण होते नबा दास?

नबा दास यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ओडिशातील झारसागुडा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तिथं त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर नबा दास यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला. नवीन पटनायक यांनी त्यांच्या सरकारमध्ये आरोग्य विभागासारखे मोठे खाते त्यांच्यावर सोपवले होते.


हेही वाचा : आरोग्यमंत्र्यांवर पोलिसानेच केला गोळीबार; छातीत ४-५ गोळ्या झाडल्या, प्रकृती गंभीर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -