घरदेश-विदेशBharat Jodo Yatra: लवकरच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा; मात्र यंदा 'चालणार'...

Bharat Jodo Yatra: लवकरच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा; मात्र यंदा ‘चालणार’ नाहीत

Subscribe

नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करत आहे. यंदा हा प्रवास पूर्वीसारखा पायी होणार नसून तो हायब्रीड करण्याची तयारी सुरू आहे. यापूर्वी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून यात्रा सुरू केली होती, जी 30 जानेवारी 2023 रोजी काश्मीरमध्ये संपली होती. (Bharat Jodo Yatra Soon Rahul Gandhi s Bharat Jodo Yatra will start But this year he will not walk gonna travel with vehicle)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेच्या तयारीत आहे. मात्र, हा प्रवास हायब्रिड केला जाईल, म्हणजे कुठे पायी तर कुठे वाहनातून राहुल गांधी प्रवास करतील. असे ठरले तर ती भारत जोडो यात्रा 2.0 असेल. ही यात्रा यावर्षी डिसेंबरमध्ये सुरू होऊ शकते, जी पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

- Advertisement -

भारत जोडो यात्रा संपल्यानंतर राहुल गांधींनी अनेकवेळा आपले अनुभव शेअर केले होते, ज्यात त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या गुडघ्यात दुखत आहे, त्यामुळे चालणे खूप कठीण आहे. मात्र जनतेकडून मिळालेल्या प्रेमामुळे त्यांनी दुःख विसरून हा प्रवास पूर्ण केला. कदाचित त्यामुळेच राहुल गांधी आणि इतर नेत्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून काँग्रेसने यात्रेचा दुसरा टप्पा हायब्रीड म्हणून निवडला आहे.

गेल्या वर्षी 7 सप्टेंबरपासून यात्रा सुरू केली होती

राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू केली होती. ज्यामध्ये राहुल गांधी यांनी पक्षाच्या अनेक नेत्यांसोबत 4 हजार किलोमीटरहून अधिकचा प्रवास केला होता. दक्षिणेतील कन्याकुमारी येथून सुरू झालेला त्यांचा प्रवास 30 जानेवारी 2023 रोजी लाल चौक, श्रीनगर येथे तिरंगा फडकवून संपला. केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाबमार्गे ही यात्रा तामिळनाडूतून काश्मीरमध्ये पोहोचली.

- Advertisement -

राहुल गांधींच्या दौऱ्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी

या यात्रेमुळे राहुल गांधी आपल्या समर्थकांसह विरोधकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरले. या मोर्चात कमल हासन, पूजा भट्ट, रिया सेन, स्वरा भास्कर, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी आणि अमोल पालेकर यांसारख्या चित्रपट आणि टीव्ही व्यक्तिमत्त्वांसह समाजातील विविध घटकांचा सहभाग होता.

यासोबतच माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) दीपक कपूर, माजी नौदल प्रमुख अॅडमिरल (निवृत्त) एल रामदास, माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन आणि माजी वित्त सचिव अरविंद यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींसह सेलिब्रिटी, लेखक, लष्करी दिग्गजही उपस्थित होते.

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांसारखे विरोधी नेतेही मोर्चादरम्यान गांधींसोबत वेगवेगळ्या वेळी चालताना दिसले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -