Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र मराठी भाषिकांना "नो एण्ट्री"; कुमार विश्वासच्या कार्यक्रमावेळी कालिदासच्या दारात गोंधळ

मराठी भाषिकांना “नो एण्ट्री”; कुमार विश्वासच्या कार्यक्रमावेळी कालिदासच्या दारात गोंधळ

Subscribe

नाशिक : शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरात हिंदी प्रसारणी सभेतर्फे जगविख्यात कवी कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी आयोजक आणि बाहेर जमलेल्या रासिकांमध्ये बाचाबाची देखील झाल्याने परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.

खरतर, हिन्दी भाषा दिनाच्या निमित्ताने कवी कुमार विश्वास यांचा कवितांचा कार्यक्रम होणार असे पोस्टर मागील काही दिवसांपासून शहरभर लावण्यात आले होते. त्यावर कुठेही कार्यक्रम आमंत्रितांसाठी तसेच शुल्क घेऊन साजरा होणार आहे असे नमूद नव्हते किंवा कार्यक्रमासाठी कोणतेही तिकीट नव्हते. मात्र, कुमार विश्वास यांना मानणारा मोठा रसिक वर्ग जसा देशभरात आहे तसाच तो नाशिक मध्येही आहे. त्यामुळे अनेक रसिक कार्यक्रमाच्या वेळी कालिदास कलामंदिरात दाखल झाले. मात्र, त्याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या हिंदी प्रसारणी सभा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिककर मराठी रसिक बांधवांना दरवाज्यातच रोखले. त्यामुळे त्याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

- Advertisement -

संतप्त झालेल्या मराठी रसिक प्रेक्षकांनी जोपर्यंत सर्वांना प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. कार्यक्रमाचे शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमाचे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, पास कुठे उपलब्ध होतील याची माहिती दिलेली नव्हती. या सर्व बाबींमुळे नाट्यगृहाबाहेर गोंधळ उडाला होता. कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रेक्षक कालिदास नाट्यगृहाच्या ठिकाणी आले त्यावेळी त्यांना पासची गरज असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे पास फक्त हिंदी भाषिकांकडे दिसत होेते. यावेळी आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होेते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -