घरदेश-विदेशबिहारमध्ये 'महागठबंधन' सरकारला ग्रीन सिग्नल, नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकारला ग्रीन सिग्नल, नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Subscribe

पाटणा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर बिहारमध्येही सत्तापालट झाला आहे. आज बिहारमध्ये विशेष अधिवेशनात नितीश कुमार यांनी आवाजी मतदाराने विश्वासदर्शक ठराव जिंकला. या विशेष अधिवेशनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, बिहारमधील सत्तासंघर्षावर आज पूर्णविराम मिळाला आहे.

सत्ताधारी आमदारांनी नितीश कुमार यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. आज विशेष अधिवेशनात अविश्वास प्रस्तावासाठी आज आवाजी मतदान घेण्यात आले. या आवाजी मतदानात नितीश कुमार यांच्या बाजूने मतदान झाल्याने त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

- Advertisement -

दरम्यान, विश्वासदर्शक ठराव होण्याआधी भाजपा नेते विजय कुमार यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर, जनता दल युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही केंद्रावर हल्ला चढवला. त्यामुळे संतापलेल्या भाजपा आमदारांनी सभात्याग केला.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, “ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग हे सरकारचे तीन जावई आहेत. जे भाजपाला शरण जात नाहीत, त्यांच्यावर या जावायांकडून दबाव आणला जातो.”

- Advertisement -

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सत्तासंघर्ष पाहायला मिळाला अगदी तसाच बिहारमध्येही संघर्ष घडला. भाजपासोबत सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेस आणि डावे पक्षासोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली. आज या पक्षाचा विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -