घरमनोरंजनआथिया आणि केएल राहुलचं 'या' दिवशी होणार लग्न, सुनील शेट्टीने दिली माहिती

आथिया आणि केएल राहुलचं ‘या’ दिवशी होणार लग्न, सुनील शेट्टीने दिली माहिती

Subscribe

सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टीला आथिया आणि राहूलच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावेळी सुनिल शेट्टीने लग्नाच्या तयारी बाबत खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहूल यांच्या लग्नाची चर्चा मागील अनेक दिवसांपासून चालू आहे. अनेकांचे त्यांच्या लग्नाकडे लक्ष लागून राहिले आहे. अशातच अभिनेता सुनिल शेट्टीने आथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहूलच्या लग्नाबाबत काही खुलासे केले आहेत. सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टीला आथिया आणि राहूलच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावेळी सुनिल शेट्टीने लग्नाच्या तयारी बाबत खुलासा केला आहे.

लग्नाच्या प्रश्नावर सुनिल शेट्टीचं उत्तर
सुनिल शेट्टीला प्रश्न विचारण्यात आला की, त्यावेळी तो म्हणाला की, “मला वाटतं हे सर्व मुलंच ठरवतील. राहुल सध्या आशिया कपमध्ये व्यस्त आहे. वर्ल्ड कप आहे. साउथ अफ्रिका टूर आहे, ऑस्ट्रेलिया टूर आहे. त्यामुळे जेव्हा त्यांना वेळ मिळेल त्या पद्धतीने ते लग्नाची तारीख ठरवतील. आता एका दिवसाच्या सुट्टीवर तर लग्न होऊ शकत नाही ना.”

- Advertisement -

मुंबईमध्ये होणार पार पडणार विवाह सोहळा

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

सूत्रांच्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपूर्वी राहुलच्या घरच्यांनी काही दिवसांपूर्वीच अथियाच्या घरच्यांची भेट घेतली होती. अथिया आणि राहुल आपल्या कुटुंबियांसोबत आपलं नवीन घर सुद्धा पाहायला गेले होते. जिथे ते लग्नानंतर राहणार आहेत. तसेच त्यांचे लग्न मुंबईमध्येच होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :नवाजुद्दीन सिद्दीकीचा स्त्री वेशातील नवा लूक, अर्चना पूरणसिंहसोबत तुलना

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -