घरदेश-विदेशआपल्यासारखा दिसत नाही म्हणून बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या

आपल्यासारखा दिसत नाही म्हणून बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या

Subscribe

बिहारमध्ये एका बापाने त्याच्या तीन महिन्याच्या मुलाची निर्घृण हत्या केली. जन्मापासून बापाने या बाळाचा स्विकार केला नाही. कारण त्याला ते बाळ त्याच्या सारखे दिसत नसल्याचे वाटत होते. त्यामुळे तो बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच रागाच्याभरात येऊन त्याने बाळाची हत्या केली.

बऱ्याचदा मुलगी नको असते म्हणून त्या मुलीचा स्विकार न करता तिची हत्या केली जाते. पण बिहारमध्ये या उलट घटना घडली आहे. मुलगा झाला पण तो माझ्यासारखा दिसत नाही यावरुन एका बापाने त्याच्या तीन महिन्याच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून तपास सुरु आहे.

हे बाळ माझं नाही?

बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील धानौरा गावात हा प्रकार घडला आहे. या गावामध्ये राहणाऱ्या ३२ वर्षीय रौशन लाठोरे याने स्वत:च्या तीन महिन्याच्या मुलाची हत्या केली. रौशन लाठौर शेती करतो. ३ महिन्यापूर्वी त्याला मुलगा झाला. पण त्याने या बाळाचा स्विकार केला नाही. कारण बाळ माझ्या सारखे दिसत नसल्याचे त्याला वाटत होते. त्यामुळे तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गेल्या तीन महिन्यापासून तिला मारहाण करत होता. हे बाळ माझं नाही याचा खरा बाप कोण आहे याची सतत विचरणा तो तिच्याकडे करत होता. या बाळावरुन पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. बायकोच्या विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत होता.

“रौशनने बाळाच्या जन्मापासून त्याचा स्विकार न करता पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरुन आरोप करत होता. हा माझा मुलगा नाही. या बाळाचा खरा बाप कोण अशी विचारणा करत तो त्याच्या पत्नीला मारहाण करत होता.” – साजिद हुसैन – पोलीस अधिकारी

- Advertisement -

असा घडला प्रकार

रविवारी रौशनची पत्नी बाळाला जेवण भरवत होती. त्यावेळी संतापलेल्या रौशनने पत्नीच्या हातातील बाळाला हिसकावून नेले. त्याच्या पत्नीने अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तीन महिन्याच्या या निष्पाप बाळाची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्या ओरडण्याचा आवाज आल्याने शेजारच्या महिला मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी तिची सुटका करत रौशनला मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. रौशनच्या पत्नीच्या तक्रारीनंतर तांडवा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -