घरCORONA UPDATEतुम्हाला माहितेय का कोरोना व्रत? या व्रतामुळे कोरोना जातो म्हणे!

तुम्हाला माहितेय का कोरोना व्रत? या व्रतामुळे कोरोना जातो म्हणे!

Subscribe

या पुजेचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

देशात सगळेचजण सध्या कोरोनामुळे चिंतीत आहेत. सरकार आणि शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. पण अशा परिस्थीतीतसुध्दा आपल्या अंधश्रध्दा काही कमी झालेली दिसत नाही. या कोरोनाच्या काळात चक्क बिहारमध्ये अंधश्रद्धेचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथील काही महिलांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून चक्क कोरोना देवीची पूजा करण्यास सरुवात केली आहे.

नालंदा, गोपालगंज, सारन, वैशाली, मुज्जफरपूर जिल्ह्यांमधील गांवांमधील महिला गावातील नद्या, विहरी आणि नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांजवळ जाऊन कोरोना नदीची पूजा करतात. या पुजेचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र ही पूजा करताना महिला सोशल डिस्टन्सींगचं पालन करताना दिसत आहेत.

- Advertisement -

अशी आहे कोरोना पुजा

या महिला सात खड्डे खोदून त्यामध्ये लवंगा, वेलची, फुले व सात ‘लाडू’ यांच्यासह गुळांचा पाक ठेवत आहेत. करोना या साथीच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी ‘कोरोना देवी’ची पूजा करत असल्याचं या महिलांच म्हणणं आहे. एक व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला कोरोनाचा पळवून लावण्यासाठी लाडू, फुले व तिळाचा प्रसाद चढवला पाहिजे अशी आपल्याला जाणीव झाल्याचे एका महिलेने सांगितले. तर दुसऱ्या एका महिलेने स्वप्नात देवीने आपल्याला दर्शन दिल्याने पूजा करण्यासाठी आल्याचे कारण दिलं.

कोरोना देवीला पोह्यांचा नैवेद्य

बर्‍याच भागांमध्ये पूजा केल्यानंतर ‘करोना देवी’ला पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. एकीकडे ग्रामीण भागातील महिलांना ‘करोना देवी’ची पूजा करण्यास सुरुवात केली असली तरी अनेकांनी ही अंधश्रद्धा असल्याचे म्हटलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लय भारी जुगाड! शिक्षीकेच्या या जुगाडाचं सोशल मीडियावर कौतुक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -