घरदेश-विदेशनितीश कुमार चोर है…; मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी

नितीश कुमार चोर है…; मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी

Subscribe

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. कोरोनाच्या काळात देखील जोरदार प्रचारसभा घेऊन राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. केंद्रीय मंत्री देखील बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असून प्रचारसभांना आता जोर धरु लागला आहे. सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या प्रचारसभेत नितीश कुमार चोर है… अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे प्रचारसभेत एकच खळबळ उडाली.

बिहारमधील रफीगंज येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रचारसभा सुरु होती. मुख्यमंत्री मतदारांना संबोधित करत असतानाच अचानक समोरच्या गर्दीमधून एकजण, “नितीश कुमार चोर है, नितीश कुमार चोर है। मनरेगा का पैसा खाया है।” अशा घोषणा देऊ लागला. त्यामुळे प्रचारसभेमध्ये गोंधळ उडाला. त्यावेळी पोलिसांनी आणि जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे सभेमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर पोलिसांनी या व्यक्तीला सभेच्या ठीकाणाहून बाहेर नेलं आणि सभा पुन्हा सुरु झाली. महारेगासंदर्भातील (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) कामांबद्दल या व्यक्तीची नाराजी असल्याचं समजतंय. दरम्यान, पोलिसांना त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

नितीश कुमार यांच्या सभेत ओरडणाऱ्या त्या व्यक्तीला काही कागदपत्र द्यायची होती. परंतु JDU च्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ दिलं नाही. त्यामुळेच या व्यक्तीने मोठ्याने आरडाओरड करुन घोषणा देण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री नितीश कुमार मंचावरुन हा सर्व प्रकार पाहत होते. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या व्यक्तीला जो कागद माझ्यापर्यंत पोहचवायचा आहे तो त्याच्याकडून घ्या आणि त्याच्याशी शांतपणे चर्चा करा, असं पोलिसांना सांगितलं.


हेही वाचा – केंद्र सरकारच्या आधी राज्य सरकार काय मदत करणार ते सांगा; फडणवीसांचा हल्लाबोल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -