घरदेश-विदेशपक्षश्रेष्ठींमुळेच पर्रिकरांना आराम मिळत नाही?

पक्षश्रेष्ठींमुळेच पर्रिकरांना आराम मिळत नाही?

Subscribe

मनोहर पर्रिकरांवर गोव्यातल्या कांदोली येथील रुग्णालयात जेव्हा उपचार सुरु होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याचे वाटर करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत गोवा, मुंबई, अमेरिका आणि दिल्लीमध्ये उपचार झाले. त्यांच्या आजारपणामुळे गोव्याच्या अंतर्गत राजकारणामध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा द्यावा असी मागणी जोर धरु लागली आहे. गोव्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री मिळावा यामागणीसाठी पर्रिकरांच्या घरावर मोर्चा काढला होता. दरम्यान मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे तसेच स्वत:कडील अतिरिक्त खात्यांचे वाटप करणे यासाठी मनोहर पर्रीकर हे स्वत:च काही महिन्यांपूर्वी तयार झाले होते. मात्र, नंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने तथा त्या पक्षाच्या श्रेष्ठींनी या विषयात हस्तक्षेप केला आणि विषय थांबला. याचाच अर्थ सगळे काही पर्रीकर यांच्या हाती राहीलेले नसल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तसंच कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

सगळे काही पर्रिकरांच्या हाती असते असे नाही

गोव्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गोव्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. गोव्यात पत्रकारांशी बोलताना विजय सरदेसाई यांनी हे वक्तव्य केल आहे. मनोहर पर्रिकरांवर गोव्यातल्या कांदोली येथील रुग्णालयात जेव्हा उपचार सुरु होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्याचे वाटर करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. मात्र भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी त्यात हस्तक्षेप केला आणि पर्रिकरांना राजीनामा देता आला नाही. दरम्यान सगळे काही पर्रिकरांच्या हाती असते असे नाही असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा द्यावा आणि गोव्याला पूर्ण वेळ मुख्यमंत्री मिळावा अशी मागणी करत मंगळवारी काँग्रेसने गोव्यात मोर्चा काढला. मनोहर पर्रिकर यांच्या निवासस्थानी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी ४८ तासांचा अल्टीमेटम देखील देण्यात आला आहे. काही एनजीओ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काढलेल्या या मोर्चाला राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला. सध्या प्रकृती अस्वास्थामुळं पर्रिकर घरातूनच राज्याचा गाढा हाकत असल्याची टीका करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -