घरदेश-विदेशभारताला अमेरिकेसारखी कारवाई शक्य नाही - चिदंबरम

भारताला अमेरिकेसारखी कारवाई शक्य नाही – चिदंबरम

Subscribe

अमेरिकेने पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये हल्ला करून ओसामा बिन लादेनला मारलं. मात्र, तशा प्रकारचा हल्ला करून हाफीज सईदला मारण्यासाठी भारत सक्षम नाही, असं वादग्रस्त वक्तव्य माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनी केलं आहे.

२०११ साली म्हणजेच ८ वर्षांपूर्वी अमेरिकेने त्या देशाचा शत्रू असलेल्या कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून मारलं होतं. त्यावर जगभरातून अमेरिकेवर कौतुकाचा वर्षाव झाला. अमेरिकेच्या हिंमतीच्या चर्चाही झाल्या. आणि विशेष म्हणजे भारतानं देखील अमेरिकेने ओसामाला मारलं तसं हाफीज सईदला पाकिस्तानात घुसून मारावं अशी अपेक्षा आणि चर्चा केली जाते. मात्र, ‘भारतामध्ये अमेरिकेसारखी कारवाई करून हाफीज सईदला मारण्याची क्षमता नाही’, असं परखड मत देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता चिदम्बरम यांच्या या वक्तव्यावरून विविध तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

बिपीन रावत यांचा दावा

मुळाच हा विषय सुरू झाला लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या एका विधानावरून. २६/११ हल्ल्याला १० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना बिपीन रावत यांनी हे विधान केलं होतं. ‘२६/११ हल्ल्यातील गुन्हेगारांना भारतही अद्दल घडवू शकतो. अमेरिकेने लादेनवर केली तशीच कारवाई भारतही करू शकतो’, अशा आशयाचं विधान बिपीन रावत यांनी केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना पी. चिदम्बरम यांनी हे विधान केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सीमेवरचा पंजाब धोक्यात; लष्कर प्रमुखांनी दिला इशारा!

‘…तर मला आश्चर्य वाटेल’

‘पाकिस्तानवर आम्ही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यात आम्हाला अपयश आलं असतं आणि आपल्या देशाला त्याचा मोठा फटका बसला असता’, असं विधान करून चिदम्बरम यांनी मोठा वाद ओढवून घेतला आहे. तसेच, ‘२६/११ हल्ल्यानंतर हाफीज सईद पाकिस्तानमध्ये लपून बसला होता, आता तो मोकाट फिरतोय. अबोटाबादसारखी कारवाई भारताला करण्याइतपत आपल्याकडे तेवढी क्षमता नाही. त्यामुळेच आम्ही त्यावेळी हल्ल्याचा मार्ग न स्वीकारता पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. आत्ता जर आपल्याकडे ती क्षमता असेल, तर मला आश्चर्य वाटेल’, असं चिदम्बरम यावेळी बोलताना म्हणाले.

काँग्रेसची झाली गोची

दरम्यान, पी. चिदम्बरम यांच्या या विधानामुळे सत्ताधारी भाजपसोबतच इतरही विरोधी पक्षांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -