घरदेश-विदेशBJP Manifesto 2024: पुढील 5 वर्षे मोफत रेशन योजना सुरू राहणार; पंतप्रधान...

BJP Manifesto 2024: पुढील 5 वर्षे मोफत रेशन योजना सुरू राहणार; पंतप्रधान मोदींनी दिली हमी

Subscribe

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींनी संकल्प पत्राचे अनावरण केले.

नवी मुंबई: 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपाच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींनी संकल्प पत्राचे अनावरण केले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर गृहमंत्री अमित शाह, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात 19 आणि 26 एप्रिल, 7, 13, 20 आणि 25 मे आणि 1 जून रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात देशातील विविध घटकांच्या विकासावर भर दिला आहे. (BJP Manifesto Release Today Free Ration Scheme to Continue for Next 5 Years Prime Minister Modi gave an assurance)

पंतप्रधान मोदी वारंवार म्हणाले आहेत की, त्यांच्या मते देशात फक्त चारच जाती आहेत – तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब. हे लक्षात घेऊन भाजपच्या निवडणूक आश्वासनांमध्ये समाजातील या चार घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या संकल्पांची पूर्तता करण्याचा रोडमॅप सादर केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पुढील 5 वर्षे मोफत रेशन योजना सुरू राहणार असल्याचं सांगितलं.

- Advertisement -

भाजपाच्या जाहीरनाम्यात काय?

*जाहीरनामा युवा, नारीशक्ती, गरीब, शेतकऱ्यांवर*

  • 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
  • गरीबांसाठी 3 कोटी घरं बांधणार
  • पुढील पाच वर्षे मोफत रेशन योजना सुरू राहणार
  • तृतीय पंथियांना आयुष्यमान योजनेत आणणार
  • आयुष्यमान योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
  • गरिब खेळाडूंना विशेष मदत देणार
  • महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार
  • पाईपमार्फत स्वस्त गॅस घरोघरी पोहोचवणार
  • शून्य वीज बिलाच्या दिशेने काम करू, पंतप्रधान सूर्यघर बिलजी योजना सुरू करणार
  • घरपोच मोफत वीज, अतिरिक्त विजेचे पैसेही मिळतील
  • मुद्रा योजनेची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे
  • पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
  • 70 वर्षांवरील वृद्धांसाठी आयुष्मान योजना

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -