घरदेश-विदेशPM Modi : योद्ध्यांना कोठडीत डांबून मोदींची मैदानात तलवारबाजी, संजय राऊतांची रोखठोक...

PM Modi : योद्ध्यांना कोठडीत डांबून मोदींची मैदानात तलवारबाजी, संजय राऊतांची रोखठोक टीका

Subscribe

पंतप्रधानपदाचा सर्व लवाजमा घेऊन नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रचार सभा घेत आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात यायला काहीच हरकत नाही, पण आचारसंहिता लागू असताना पंतप्रधानपदाच्या सुविधांचा वापर करणे, हे नियमात बसत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रामाचा जप करतात, पण युद्धभूमीवर सत्याने नव्हे, तर कपटनीतीने वागत आहेत. कंसाने ज्याप्रमाणे त्याच्या सर्व शत्रूंना म्हणजे सज्जनांना बंदी बनवले, तसे मोदी यांनी केले. युद्धभूमीवरील सर्व योद्ध्यांना कोठडीत डांबून मोदी मैदानात तलवारबाजी करीत आहेत, अशी रोखठोक टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024: Sanjay Raut criticizes Modi from Rokhthok column)

महाराष्ट्राचे युद्ध हेच खरे महाभारत आहे. दुष्टांचे निर्दालन हे श्रीकृष्णाचे ध्येय होते. त्यासाठी त्याने सर्व प्रकारच्या खटपटी केल्या. साधनशूचिता आणि भीष्माने ठरवून दिलेले युद्धाचे नियमही त्याने पाळले नाहीत. द्रोणाचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने धर्मराजाला खोटे बोलायला लावले. धर्माने शल्यालाही युद्धाच्या वेळी, “तू कर्णाला दूषणे देऊन नामोहरम कर,” असे सांगितले. जयद्रथाचा वध करणे अर्जुनाला शक्य व्हावे म्हणून सूर्य झाकून त्यास फसवले. कर्णाचा वध तर संशयास्पदच आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : गरीब महिलांना एक लाख रुपये देणार; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ग्वाही

शेषन यांच्या काळात मोदींनी हे वर्तन केले असते तर…

पंतप्रधानपदाचा सर्व लवाजमा घेऊन नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रचार सभा घेत आहेत. मोदी यांनी महाराष्ट्रात यायला काहीच हरकत नाही, पण आचारसंहिता लागू असताना पंतप्रधानपदाच्या सुविधांचा वापर करणे, हे नियमात बसत नाही. टी. एन. शेषन यांच्या काळात मोदी यांनी हे वर्तन केले असते तर, शेषन यांनी मोदी यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला असता, असे संजय राऊत यांनी नमूद केले आहे.

- Advertisement -

विषम पातळीवरील लोकसभा निवडणूक

देशात लोकसभा निवडणूक विषम पातळीवर लढवली जात आहे. भाजपाकडे एका बाजूला प्रचंड साधन संपत्ती, सरकारी यंत्रणा, पोलीस, मीडियाचे बळ आहे, तर विरोधकांना काहीच मिळू नये यासाठी राज्यकर्ते सर्व पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. त्यांची बँक खातीही सरकारने सील केली. लढणाऱ्यांची सर्व शस्त्रे जबरदस्तीने काढून घ्यायची आणि मग “आता आम्हीच जिंकणार” असे जाहीर करायचे, असे सध्या मोदी यांचे चालले असल्याची टीकाही खासदार संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ या सदरातून केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कोरोनामध्ये हजारो लोकं मरत असताना, मोदी थाळ्या वाजवायला सांगत होते; काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -