घरदेश-विदेश"भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी नव्हे तर..."; मणिशंकर अय्यरचे वादग्रस्त टीका

“भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजयेपी नव्हे तर…”; मणिशंकर अय्यरचे वादग्रस्त टीका

Subscribe

नवी दिल्ली : अटलबिहारी वाजयेपी हे भाजपचे पहिले पंतप्रधान नव्हे. तर भापचे पहिले पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव होते, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसनेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानंतर राजयकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पी. व्ही. नरसिंह राव यांनी 1991 मध्ये काँग्रेस सरकारचे नेतृत्व केले. नरसिंह राव यांनी 1991 ते 1996 पर्यंत ते भारताचे नववे पंतप्रधान म्हणून काम केले. नरसिंह राव यांच्याकाळात बाबरी मशीद पाडण्यात आली होती.

राम-रहीम यात्रेच्या वेळी नरसिंह राव यांच्यासोबत झालेल्या संवादावर मणिशंकर अय्यर म्हणाले, “माझ्या यात्रेला कोणताही विरोध नाही. पण धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येशी माझा सहमत नाही. तेव्हा मी त्यांना विचारले की, माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत काय चूक आहे का? या प्रश्न विचारला. तेव्हा सांगितले की, भारत हा हिंदूचा देश आहे. मी माझ्या खुर्चीत बसलो असलो तरी भाजपही तेच म्हणणते, असे अय्यर यांनी सांगितले. अटलबिहारी वाजयेपी हे भाजपचे पहिले पंतप्रधान नव्हते. तर भाजपचे पहिले पंतप्रधान नरसिंह राव होते”, अशी टीका मणिशंकर अय्यर यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “कांद्यानंतर आता साखरेवरील निर्यात शुल्क वाढेल”, शरद पवारांनी व्यक्त केली भीती

मणिशंकर अय्यरांचे आत्मचारित्र

मणिशंकर अय्यर यांच्या ‘मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक… द फर्स्ट फिफ्टी इयर्स’ त्यांच्या आत्मचारित्र पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांना दिलेल्या मुलाकतीत त्यांनी राजकारणातील विविध मुद्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -