घरदेश-विदेशसीमेवरील घुसखोरी आणि तस्करीला आता मधमाशांचा डंख; बीएसएफचा अनोखा प्रयोग

सीमेवरील घुसखोरी आणि तस्करीला आता मधमाशांचा डंख; बीएसएफचा अनोखा प्रयोग

Subscribe

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत होणाऱ्या घुसखोरीला भारतीय लष्कराने बऱ्यापैकी आळा घातला आहे. घुसखोरीचे प्रयत्न बांगलादेश सीमेवरूनही होत असतात. भारतीय जवानांनी हे प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडले आहेत. सीमावर्ती भागातील या घुसखोरी आणि तस्करीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता भारताने एक अनोखी क्लृप्ती योजली आहे. भारतीय जवानांबरोबरच मधमाशाही तैनात करण्यात येत आहेत. सैनिक बनलेल्या या मधमाशा भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाला (BSF) मदत करतील.

हेही वाचा – कोस्टल रोडच्या कामासाठी ‘हा’ मार्ग सात महिन्यांसाठी बंद; वाचा सविस्तर

- Advertisement -

भारत-बांगलादेश सीमा 4096 किलोमीटर लांब आहे. त्यापैकी पश्चिम बंगालमध्ये ती 2217 किलोमीटर आहे. या सीमेवर आधी तारेचे कुंपण घालण्यात आले. पण ते कापून घुसखोरी केली जात होती. त्याला उपाय म्हणून त्यात विद्युतप्रवाह सोडण्याचा प्रयोगही करण्यात आला. पण आता पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यात बीएसएफने 2 नोव्हेंबरला मधमाशांचा अनोखा प्रयोग केला आहे.

व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामअंतर्गत बीएसएफच्या 32 बटालियनने हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने कुंपणाजवळ मधमाशी पालनाचे काम केले जात आहे. त्यामुळे तेथील लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. आयुष मंत्रालयाच्या मदतीने हा उपक्रम आता सीमावर्ती भागात राबविण्यात येत आहे. मधमाशा मुबलक प्रमाणात जमा होतील, अशी झाडे आणि फुले लावली जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दोन समाजातील कोंबडे झुंजवायाचे आहेत; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

या मधमाशांपासून तयार होणारा मध बीएसएफमार्फत विकला जाणार आहे. स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल. तर दुसरीकडे, जेव्हा कोणी घुसखोरी किंवा तस्करीसाठी कुंपण कापण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा मधमाशा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करतील. असा दुहेरी फायदा यामुळे होणार आहे.

दिवसागणिक नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. या तंत्रज्ञानाबरोबरच त्याचा दुरुपयोग करणारे देखील आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना सायबर हल्ल्यांचा धोकाही तितकाच असतो. त्यामुळे भारताने थेट निसर्गाचीच मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मधमाशांना सैनिक बनवण्याचा प्रयोग जगात प्रथमच केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -