घरमहाराष्ट्रदोन समाजातील कोंबडे झुंजवायाचे आहेत; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

दोन समाजातील कोंबडे झुंजवायाचे आहेत; जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल

Subscribe

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांना मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय की यांना दोन समाजामधील कोंबडे झूंजवायाचे आहेत.

मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मंगळवारी (7 नोव्हेंबर) शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं काय घडलं याची उत्स्कुता सगळ्यांनाच लागली होती. या भेटीबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खुलासा केला असून, यावेळी त्यांनी सरकारवरही हल्लाबोल केला. (The roosters of the two societies are quarrelsome Jitendra Awhad attacked the government)

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांना मराठा-ओबीसी आरक्षणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी पहिल्या दिवसांपासून सांगतोय की यांना दोन समाजामधील कोंबडे झूंजवायाचे आहेत. तर पुढचे वर्ष कसे अस्थिर करता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहे. सध्या यांच्या पायाखालील जमीन हललेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील दोन मोठे समाज कसे एकमेंकाशी भीडतील यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लक्षात येत आहे. असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला केला.

- Advertisement -

हेही वाचा : केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या ताफ्याचा अपघात, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

ती राजकीय नव्हे कौटुंबीक भेट

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट ही राजकीय नव्हती तर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी होती. ही थोडी कौटुंबीक भेट होती. त्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, म्हणून याला का नाही बोलावलं आणि त्याला का नाही बोलावलं असं काही यामध्ये नव्हतं त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; साखळी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन, पण…

घटनात्मक दुरुस्तीशिवाय आरक्षण मिळत नसते

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना आव्हाड म्हणाले की, घटनात्मक दुरुस्ती झाल्याशिवाय कुठलेही आरक्षण मिळत नाही. ज्याला कायदा समजतो त्याला हे सगळं माहिती आहे की, लोकसभेत जोपर्यंत विधेयक मांडून ते समंत केले जात नाही तोपर्यंत कायदा बनत नाही. तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही. ईडब्ल्यूएसचे आरक्षण कसे मिळाले ते विधेयक संमत झाल्यानंतरच ना. एवढच जर तुम्हाला वाटत असेल तर मग जाट, गुर्जरांना का आरक्षण दिले नाही, तुम्ही खोटे बोलताय, तुम्हाला दोन्ही समाज आमनेसामने आणून मजा घ्यायची आहे. आणि ती पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्या की लढाईला सुरुवात होते. मी ओबीसी असूनही मला वाटते की, मराठा आरक्षण मिळाले पाहीजे, परंतू त्याला संविधानिक पाठपुरावा पाहीजे. हे मंत्रिमंडळ फक्त दोन समाजात संघर्ष कसा होईल आणि त्यातून आपला कसा फायदा होईल याकडे त्यांचे लक्ष आहे. त्यातून त्यांना सत्ता मिळवायची आहे. यापेक्षा त्यांना कुठल्याही समाजाविषयी काहीच घेणंदेणं नाही असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -