घरदेश-विदेशऑस्ट्रेलियन व्हिसा मिळवण्यासाठी बहिण-भावांनी ऐकमेकांशी बांधली लग्नगाठ

ऑस्ट्रेलियन व्हिसा मिळवण्यासाठी बहिण-भावांनी ऐकमेकांशी बांधली लग्नगाठ

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळवण्यासाठी बहिणीने भावाबरोबर लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खोट्या कागदपत्रांची मदत घेऊन तिने परदेशात जाण्याचा प्रयत्न केला.

परदेशात जाण्यासाठी दरवर्षी लाखो भारतीय तरुण प्रयत्न करतात. काही कारणामुळे त्यांचा व्हिसा अर्ज रद्द केला जातो. यावर शॉर्टकर्ट म्हणून परदेशी नागरिकाशी लग्नाचा पर्याय अनेक भारतीय निवडतात. परदेशी नागरिकाशी लग्न केल्यावर तेथील व्हिसा आणि नागरिकत्व सहज मिळते म्हणून अनेकांकडून हा पर्याय सर्रास वापरला जातो. या प्रकारामुळे अनेकदा लग्नाचेही करार परदेशात होतात. मात्र पंजाब येथील एका तरुणीने ऑस्ट्रेलियाचा व्हिसा मिळवण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली आहे. ऑस्ट्रेलियाचा व्हिसा असलेल्या भावाशी लग्न करून ही तरुणी खोट्या कागदपत्रावर ऑस्ट्रेलियाला गेली. मात्र तिथे तिचा हा प्रयत्न उघडकीस आला आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली आहे.

“त्यांनी सामाजिक प्रणाली, कायदेशी व्यवस्था आणि धार्मिक बाबींना धोका देण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशात जाण्याच्या इच्छेने या तरुणांना वेड लावले आहे. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार मात्र त्यांना अटक करु शकत नाही.” –  ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन अधिकारी

- Advertisement -

खोट्या कागदपत्रांचा केला वापर

दरवर्षी १५०० हून अधिक व्हिसा अर्ज रद्द करण्यात येतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१२ ला या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोटी कागदपत्र बनवली होती. येथील स्थानिक गुरुद्वारेत त्यांचे खोटे लग्न लावून दिले होते. खोट्या नावाने बँक खाती आणि पासपोर्ट बनवण्यात आलेत. याचा वापर त्यांना एअरपोर्टवर केला. इमिग्रेशन अधिकाऱ्यांचीही त्यांनी फसवणूक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -