घरदेश-विदेशसीतारामन यांनी अर्थसंकल्प लाल बासनातच का आणला?

सीतारामन यांनी अर्थसंकल्प लाल बासनातच का आणला?

Subscribe

अर्थसंकल्पाच्या कागदपत्रांना आता बजेट ऐवजी खतावणी (बही खाता) म्हटले जाणार आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी हा नवा खुलासा केला आहे. आज परंपरा मोडत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ब्रिफकेसऐवजी लाल बासनात लोकसभेत आणला. त्यामुळे देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्र्यांचे पहिलेच बजेट सादरीकरणापूर्वीच चर्चेत आले आहे.

हिशेबाची लाल वही किंवा खतावणी ही आपली भारतीय परंपरा असून लाल रंग मांगल्याचे प्रतीक समजला जातो. त्यामुळे ही भारतीय परंपरा जपत अर्थमंत्र्यांनी आज लाल रंगाच्या कापडात अर्थसंकल्प गुंडाळून आणला. आपण पाश्चिमात्य विचारांच्या गुलामगिरीत अडकलो होतो, त्याऐवजी स्वदेशी परंपरा लाल कपड्यामुळे जपली जाणार असल्याचे मुख्य अर्थ सल्लागारांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

- Advertisement -

देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन आज संसदेत आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी २.० सरकारचाही हा पहिलाच अर्थसंकल्प असून जनतेला या अर्थसंकल्पाबद्दल बऱ्याच अपेक्षा आहेत. लाल रंगाच्या बासनामुळे सादरीकरणापूर्वीच हा अर्थसंकल्प चर्चेत आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -