घरदेश-विदेशफेसबुक अध्यक्ष मार्क झुकरबर्गला पदावरुन हटवा; गुंतवणुकदारांची मागणी

फेसबुक अध्यक्ष मार्क झुकरबर्गला पदावरुन हटवा; गुंतवणुकदारांची मागणी

Subscribe

मार्क झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याच्या निर्णय पुढच्या वर्षी मे मध्ये होणार आहे. जेव्हा कंपनीच्या भागिदारांची वार्षिक बैठक होईल. या बैठकीमध्ये या मार्क झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याच्या प्रस्तावावर मतदान होईल. त्यानंतर शेवटचा निर्णय घेतला जाईल.

फेसबुक या सोशल नटेवर्किंग साईटचा अध्यक्ष मार्क झुकरबर्गला अध्यक्ष पदावरुन हटवण्याची मोहिम जोर धरु लागली आहे. मार्क झुकरबर्गला पदावरुन हटवण्याची जोरदार मागणी होत आहे. फेसबुकच्या गुंतवणुकदारांनी ही मागणी केली आहे. यावर अद्याप फेसबुक कंपनीकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. मार्क झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याच्या निर्णय पुढच्या वर्षी मे मध्ये होणार आहे. जेव्हा कंपनीच्या भागिदारांची वार्षिक बैठक होईल. या बैठकीमध्ये या मार्क झुकरबर्गला पदावरुन काढून टाकण्याच्या प्रस्तावावर मतदान होईल. त्यानंतर शेवटचा निर्णय घेतला जाईल.

मार्क झुकरबर्गला पदारुन हटवा

गेल्या काही दिवसांपासून फेसबुकचा डाटा हॅक होण्याच्या घटना वाढत चालल्या आहे त्यामुळे झुकरबर्गला पदावरुन हटवण्याची मागणी जोर धरत आहे. इलियॉनिस, ऱ्होड आइसलंड, पेनिसिल्वेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंट्रोलर स्कॉट स्ट्रींगर यांनी मिळून कंपनीकडे संयुक्तरित्या हा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावामध्ये त्यांनी जून महिन्यामध्ये मार्क झुकरबर्गला पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाला मोठमोठ्या अॅसेट मॅनेजरचे समर्थन मिळेल असा या गुंतवणूकदारांचा अंदाज आहे.

- Advertisement -

झुकरबर्ग यांच्याकडे सर्वाधिक शेअर

मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात जरी मोहिम राबवली जात असली तरी सध्या फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स झुकरबर्ग याच्याकडेच आहेत. एप्रिल महिन्यात कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार झुकेरबर्ग यांच्याकडे ६० टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारला जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. झुकरबर्गला पदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या न्यूयॉर्क सिटी पेंशन फंड कंपनीकडे ४५ लाख शेअर्स आहेत. तर पेनिसिल्वेनियाकडे ३८,७३७ शेअर्स आहेत. तर ट्रिलियम एसेट मॅनेजमेंट यांच्याकडे ५३००० शेअर्स आहेत.

वारंवार युजर्सची माहिती होत आहे लीक

फेसबुकवरुन युजर्सचा डाटा लीक झाल्याच्या प्रकरणावरुन फेसबुकचे अध्यक्ष मार्क झुकरबर्ग याने युजर्सची माफीही मागितली होती. युजर्सची नाव, पत्ता अशी प्राथमिक माहिती चोरीला गेल्याचे समोर आले होते. त्यानंतरही फेसबुक युजर्सची माहिती लीक होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातही ५ कोटी अकाऊंटसची माहिती लीक झाली होती. त्यानंतर १ कोटी ४० लाख युजर्सची फेसबुक प्रोफाइलवर असणारी वैयक्तिक माहिती चोरीला गेली. तर मागील आठवड्यातच पुन्हा ३ कोटी युजर्सची माहिती लीक झाली असल्याचे देखील समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -