घरताज्या घडामोडीPunjab Congress : आता काँग्रेसमध्ये राहणार नाही, भाजप प्रवेशावर कॅप्टन अमरिंदर सिंह...

Punjab Congress : आता काँग्रेसमध्ये राहणार नाही, भाजप प्रवेशावर कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणतात…

Subscribe

माझ्यासोबत जी वागणूक करण्यात आली ती मी सहन करणार नाही.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून पंजाबच्या राजकारणात राजीनामा सत्र सुरु झालं आहे. नुकताच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनी अध्यक्षतेचा राजीनामा दिला परंतु हायकमांडने तो फेटाळला आहे. तर आता दिल्ली दौऱ्यावर असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस सोडणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेस सोडणार असल्याचे कॅप्टन यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सध्या काही ठरलं नसल्याचेही कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री असूनही नाराज असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर आता काँग्रेसशी फारकत घेणार असल्याची घोषणा केली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटलं आहे की, मी यापुर्वीच स्पष्ट केलं आहे की, यापुढे आपला अपमान सहन करणार नाही. माझ्यासोबत जी वागणूक करण्यात आली ती मी सहन करणार नाही. काँग्रेसमध्ये यापुढे राहणार नसून भाजपमध्ये प्रवेश करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यात आल्यास प्रवेश करतात का? हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस सोडणार असल्याची घोषणा केल्यावर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील बदल केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर माजी सैनिक, पंजाब माजी मुख्यमंत्री, राज्याच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे लिहिले आहे.

- Advertisement -

दिल्लीत अमित शाह यांची भेट

कॅप्टन अमरिंदर सिंह दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमरिंदर सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, यांच्याशी भेट घेतली आहे. पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावरसुद्धा पंजाब आपला असल्यामुळे जनसेवा करत राहणार असे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Afghanistan: तालिबानची क्रूरता सुरुच! फोटोग्राफर मुर्तजा समधीला चढवणार फासावर


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -