घरताज्या घडामोडीभारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर पद्मावती यांचे निधन

भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर पद्मावती यांचे निधन

Subscribe

भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एसआय पद्मावती यांचे वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले आहे.

भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एसआय पद्मावती यांचे वयाच्या १०३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ११ दिवसांपूर्वी त्यांना नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट (एनएचआय) मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

रुग्णालयाचे मुख्य अधिकारी डॉ. ओ. पी. यादव यांनी सांगितले आहे की, डॉ. पद्मावती यांना दोन्ही फुफ्फुसात गंभीर संक्रमण झाले होते. त्यात त्यांचे निधन झाले आहे.

- Advertisement -

कार्डिओलॉजी गॉडमदर यांच्याविषयी…

२०१५ च्या अखेरीस त्या आठवड्यातून पाच दिवस १२ तास एनएचआयमध्ये त्या काम करत होत्या. त्यांनी १९८१ मध्ये एनएचआयची स्थापना केली होती आणि त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘कार्डिओलॉजीची गॉडमदर’ ही पदवी देण्यात आली. तसेच त्यांनी १९५४ मध्ये लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये उत्तर भारतातील प्रथम हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी प्रयोगशाळा स्थापन केली होती. तसेच त्यांनी १९६७ मध्ये मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे संचालक-प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्या इर्विन व जी. बी. पंत रुग्णालयात रुजू झाले आणि त्यांनी तिथूनच कार्डिओलॉजी पहिला डीएम कोर्स, पहिले कोरोनरी केअर युनिट आणि भारतातील पहिली कोरोनरी केअर व्हॅन सुरु केली.


हेही वाचा – कोरोनाचा फैलाव दिवाळीपर्यंत नियंत्रणात येणार – केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा विश्वास

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -