घरदेश-विदेशभारत - चीन सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष; पूर्व लडाख भागात घुसखोरीचा प्रयत्न

भारत – चीन सैनिकांमध्ये पुन्हा संघर्ष; पूर्व लडाख भागात घुसखोरीचा प्रयत्न

Subscribe

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली असून हा संघर्ष पूर्व लडाख येथील पँगॉग तलावाजवळच्या परिसरात झाला असल्याचे सांगितले जात आहे. ही चकमक २९ आणि ३० ऑगस्टच्या दरम्यान झाल्याचे समजते. जून महिन्यातदेखील चीनच्या सैनिकांनी गलवानच्या खोऱ्यात भारतीय सैनिकांसमोर शिरजोरी केली होती. त्यावेळी चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. आता पुन्हा एकदा चीनने घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. लडाखच्या पूर्व भागात पँगॉग त्सो लेक भागात चीनचा आक्रमकपणा दाखवला असून दक्ष भारतीय सैनिकांनी चीनचा डाव उधळून लावला आहे. लष्कराचे प्रमुख कर्नल अमन आनंद यांची याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

चीनी सेनेच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (PLA) जवानांनी शेवटच्या बैठकीत झालेला करारही तोडला आणि पूर्व लडाख भागात परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करताना घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र भारतीय जवानांनी PLA च्या जवानांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. पँगाँग तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावर चीनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांतील लष्कर प्रमुखांमध्ये चर्चाही झाल्या. चर्चेअंती काही करार करण्यात आले. मात्र चीनने काल मध्यरात्री घुसखोरीचा प्रयत्न करून हा करार मोडला आहे.

हेही वाचा –

बांगलादेशने Corona लसीसाठी भारतसह केला करार; Beximco करणार गुंतवणूक!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -