घरदेश-विदेशSidhu Moosewala : 58 व्या वर्षी दिला बाळाला जन्म; पंजाब सरकारला केंद्रीय...

Sidhu Moosewala : 58 व्या वर्षी दिला बाळाला जन्म; पंजाब सरकारला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नोटीस

Subscribe

नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करुन 17 मार्चला मुलाला जन्म दिला. पण या बाळाच्या जन्मावरून आता सिद्धू मुसेवालाची आई आणि त्याचं कुटुंब अडचणीत सापडलं आहे. सिद्धू मुसेवालाच्या आईला आरोग्य मंत्रालयाने नोटीस पाठवली आहे. दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची आई चरण कौर आणि पिता बलकौर सिंह यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. याची माहिती त्याचे वडील बलकौर सिंह यांनी दिली. चरण कौर यांनी 58 व्या वर्षी आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला. यावरुन आता केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने पंजाब सरकारकडे आणि सिद्धू मुसेवालाच्या आईकडे आयव्हीएफ ट्रिटमेंटवर विस्तृत रिपोर्ट मागवला आहे.

मुसेवालाच्या वडिलांचे सरकारवर आरोप

सिद्धू मुसेवालाचे वडिल बलकौर सिंह यांनी एक व्हिडीओ शेअर करत काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारवर आरोप केले आहेत. मुलाच्या जन्मानंतर पंजाब सरकार सातत्याने त्यांना त्रास देत आहे. बेकायदेशीर मार्गाने मूल जन्माला घालण्याबद्दल पुरावा मागितला जात आहे. आम्ही सध्या बाळाची काळजी घेण्यात व्यस्त आहोत, असं म्हणत सिद्धू मुसेवालाच्या वडिलांनी पंजाब सरकारवर आरोप केले आहेत. आता आरोग्य मंत्रालय सिद्धू मुसेवालाची आई आणि त्यांच्या कुटुंबावर कशी कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Gautam Singhania : मुलाला संपत्ती देऊन पश्चाताप करणारे विजयपत सिंघानिया घरी परतले

नियम काय सांगतो?

केंद्रीय गृह मंत्रालयाने 14 मार्च रोजी एक पत्र पाठवून पंजाब सरकारकडून चरण कौर यांचे आयव्हीएफ रिपोर्ट मागवले आहेत. यासाठी त्यांनी एका मीडिया रिपोर्टचा हवाला दिला आहे. यामध्ये म्हटलंय की, कौर यांनी 58 व्या वर्षी आयव्हीएफ उपचार घेतले. सहाय्यक प्रजनन प्रौद्योगिकी (विनियमन) अधिनियम 2021 अनुसार ART सेवांच्या आधारी आई होणाऱ्या प्रत्येक महिलेची वयोमर्यादा 21 ते 50 निश्चित केली गेली आहे. चरण कौर 58 व्या वर्षी आई झाल्या आहेत. त्यामुळे चरण कौर यांच्या आई होण्यावर अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. आपण या प्रकरणी लक्ष घालून एआरटी (नियमन) अधिनियम 2021 च्या नुसार केलेल्या कारवाईचा रिपोर्ट द्यावा.यासंबंधित कारवाईची कॉपी लवकरच दिली जाईल.”

- Advertisement -

हेही वाचा – Omar Abdullah : जम्मू – काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही; ओमर अब्दुल्ला यांचा विरोध

दरम्यान, सरकार आम्हाला त्रास देत असल्याचं सिद्धूचे वडील बलकौर यांनी म्हटलंय. एका ते व्हिडीओमध्ये म्हणतात, “वाहेगुरुंच्या आशीर्वादाने आमचा शुभदीप काही दिवसांपूर्वी परत आला आहे, मात्र, हे सरकार मला त्रास देतंय. ते मला बाळाची कागदपत्रे देण्यास सांगत आहेत. हे मूल कायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी ते माझी चौकशी करत आहेत. ते पुढे म्हणतात, मुख्यमंत्री भगवंत मान यांना माझी विनंती आहे की, माझ्या पत्नीचे उपचार पूर्ण होईपर्यंत तुम्ही थांबा. मी इथेच आहे, तुम्ही मला जेव्हा कॉल कराल तेव्हा मी तुमच्याकडे चौकशीसाठी येईन आणि मी सर्व कायदेशीर कागदपत्रे देईन. फक्त माझ्या पत्नीची ट्रीटमेंट आधी पूर्ण होऊद्यात.” असा एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -