घरताज्या घडामोडीAAP : लोकसभेपूर्वी 'आप'ला धक्का; प्रदेशाध्यक्षानेच सोडली पक्षाची साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

AAP : लोकसभेपूर्वी ‘आप’ला धक्का; प्रदेशाध्यक्षानेच सोडली पक्षाची साथ, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण उमेदवारीसाठी सध्या असलेल्या पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. राज्यासह देशभरातील अनेकांनी पक्ष सोडले. अशातच आम आदमी पार्टीलाही आता मोठा धक्का बसला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण उमेदवारीसाठी सध्या असलेल्या पक्षाची साथ सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. राज्यासह देशभरातील अनेकांनी पक्ष सोडले. अशातच आम आदमी पार्टीलाही आता मोठा धक्का बसला आहे. कारण आमच्या प्रदेशाध्यक्षा सीमा शिवाजी गुट्टे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सीमा गुट्टे यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (aam aadmi party state president seema gutta joined the congress party before lok sabha 2024)

“देश सध्या बिकट परिस्थितीतून जात असताना काँग्रेसची विचारधाराच या देशाला तारु शकते. सर्व समाज घटकांना न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची परंपरा राहिली आहे. भारत जोडो न्याय यात्रेमुळे सर्वसामान्य जनतेचा काँग्रेस पक्षावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान महिला सक्षमिकरणावर विशेष भर देत ‘महिला न्याय’च्या पाच गॅरंटी काँग्रेस पक्षाने दिलेल्या आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत असून लवकरच इतर पक्षातील आणखी लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करतील” वक्तव्य नाना पटोले यावेळी केले.

- Advertisement -

सीमा गुट्टे यांनी सामाजिक, शैक्षणिक व महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आम आदमी पार्टीच्या पुणे जिल्हा महिला बचत गटाच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मुलींच्या शैक्षणिक समस्यांवर कार्यशाळा आयोजित करणे, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय उत्सवांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे.


हेही वाचा – LokSabha Election : नागपूर, चंद्रपूरसह पाच जागांसाठी अधिसूचना; महायुती, मविआचे उमेदवार कधी ठरणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -