घरमुंबईGautam Singhania : मुलाला संपत्ती देऊन पश्चाताप करणारे विजयपत सिंघानिया घरी परतले

Gautam Singhania : मुलाला संपत्ती देऊन पश्चाताप करणारे विजयपत सिंघानिया घरी परतले

Subscribe

मुंबई : रेमंडचे एमडी आणि अध्यक्ष गौतम सिंघानिया नेहमीच आपल्या कौटुंबिक वादामुळे माध्यमांत चर्चेत राहिले आहेत. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण त्यांचे वडील वियपत सिंघानिया यांची घरवापसी झाली आहे. गौतम सिंघानिया यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. (Gautam Singhania Repentant Vijaypat Singhania returns home after giving wealth to his son)

हेही वाचा – Politics : महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; गुरुवारी दिल्लीत बैठक

- Advertisement -

रेमंड लिमिटेड कंपनीची सूत्रे, कंपनी आणि सुमारे 12 हजार कोटी रुपयांचे सर्व शेअर्स 2015 मध्ये मुलाच्या नावावर केल्यानंतर विजपत सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यात एका घरावरून वाद सुरू झाला होता. विजयपत सिंघानिया यांना घर विकायचं होतं, मात्र गौतम सिंघानिया यांनी या गोष्टीला विरोध केला होता. या दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की, कुटुंबातील भांडण चव्हाट्यावर आले होते.

गौतम सिंघानिया यांना आपल्या वडिलांना बेघर केले होते. एवढंच नाही, तर विजयपत सिंघानिया यांच्या नावापुढे चेअरमन-एमेरिटस लिहिण्याचा अधिकारही गौतम सिंघानिया यांनी काढून घेतला होता. यानंतर विजयपत सिंघानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगतिले होते की, आपल्या मुलाला सर्व देऊन ‘मूर्खपणा’ केल्याचे जाहीरपणे सांगितले होते. तसेच असं करण्यापूर्वी पालकांनी खूप काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, असा आवाहनही केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : ज्यावेळेस दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील तेव्हा मी…; अजितदादांचे मिश्किल भाष्य

विजयपत सिंघानिया यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. परंतु आता दोघांमधील वाद संपल्याचे दिसत आहे. गौतम सिंघानिया यांनी आपल्या वडिलांचे घरात स्वागत केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, आज मी आनंदी आहे, कारण माझे वडील घरी परतले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. बाबा तुमच्या आरोग्यासाठी सदैव शुभेच्छा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -