Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश हनीट्रॅपचे प्रमाण वाढले, केंद्राच्या गुप्तचर विभागाने जवानांना पाठवल्या नोटीस

हनीट्रॅपचे प्रमाण वाढले, केंद्राच्या गुप्तचर विभागाने जवानांना पाठवल्या नोटीस

Subscribe

गेल्या काही महिन्यात देशात जवानांशी संबंधित हनीट्र्रॅपची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे आता केंद्रीय गुप्तचर विभागाने जवानांशी संबंधित काही निर्णय घेतले आहेत.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात देशात केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांशी संबंधित अनेक घटना समोर येत आहेत. ज्यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जवानांशी संबंधित हनीट्र्रॅपची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे आता केंद्रीय गुप्तचर विभागाने जवानांशी संबंधित काही निर्णय घेतले आहेत. या प्रकरणी विविध प्रकारची निमलष्करी दले आणि पोलीस दलातील जवानांना याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जवानांनी गणवेशात व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करू नयेत, अशा सूचना केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आलेल्या आहेत. (Central intelligence sent notices to jawans due to increase in honeytraps)

हेही वाचा – CBI Clean Chit : आज क्लिनचीट दिली तरी…; रश्मी शुक्ला प्रकरणी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

याशिवाय, जवानांनी स्वतःचे फोटो किंवा सोशल मीडियावर स्वतःची वैयक्तिक माहिती शेअर करू नये, याबाबत देखील निर्देश देण्यात आले आहेत. कित्येक जवान आपल्या युनिफॉर्ममध्ये व्हिडिओ पोस्ट करतात आणि अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग देखील करतात असे आढळून आल्यामुळे ही नोटीस जारी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, सोशल मीडियावर नवीन फ्रेंड्स जोडताना एखाद्या अकाउंटबाबत पूर्ण खात्री करून मगच ते आपल्या लिस्टमध्ये अ‍ॅड करावेत, अशी महत्त्वपूर्ण सूचना देखील जवानांना देण्यात आली आहे.

सोशल मीडियाच्या या युगात एकमेकांपासून दूर राहणारी माणसे जवळ आलेली असली तरी या सोशल मीडियाचा गैरवापर देखील करण्यात येत आहे. बऱ्याचदा जवान सुद्धा आपल्या युनिफॉर्ममध्ये विविध रिल्स बनवतात आणि त्या सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यामुळे प्रतिबंधित भागात रिल्स तयार करून त्या पोस्ट करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलीस कमिश्नर संजय अरोरा यांनीदेखील एका स्वतंत्र नोटीसद्वारे जवानांना आणि पोलिसांना याबाबतचे निर्देश दिले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीबाबत, अंडर ट्रायल व्यक्तीबाबत किंवा संवेदनशील विषयांबाबत पोस्ट किंवा कमेंट करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. याच महिन्यात विशाखापट्टणम येथे तैनात असणाऱ्या सीआयएसएफ जवानाला हनीट्रॅप करण्यात आले होते. तो एका पाकिस्तानी महिला एजंटच्या संपर्कात होता आणि मोठ्या प्रमाणात संवेदनशील माहिती त्याने शेअर केली होती, ज्यानंतर आता केंद्रीय गुप्तचर विभाागाकडून जवानांसाठी हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.

- Advertisment -