घरमुंबईCBI Clean Chit : आज क्लिनचीट दिली तरी...; रश्मी शुक्ला प्रकरणी नाना...

CBI Clean Chit : आज क्लिनचीट दिली तरी…; रश्मी शुक्ला प्रकरणी नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Subscribe

CBI Clean Chit : 2019 मध्ये रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या महाराष्ट्र (Maharashtra) गुप्तचर विभागाच्या तत्कालीन प्रमुख पदी विराजमान होत्या. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. परंतु दोन दिवसांपूर्वी सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिला आणि न्यायालयानेही हा रिपोर्ट स्वीकारला. यानंतर आता राज्याच्या राजकारणात तापलेले फोन टॅपिंग प्रकरण पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी क्लीनचीट (CBI Clean Chit) मिळाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु आज क्लिनचीट दिली तरी भविष्यात आम्ही फाईल उघडू, असं मोठं वक्तव्य काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष (Congress Mumbai State President) नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे. (CBI Clean Chit Todays clean chit is hearty Nana Patole statement in Rashmi Shukla case)

हेही वाचा – “कांद्यानंतर आता साखरेवरील निर्यात शुल्क वाढेल”, शरद पवारांनी व्यक्त केली भीती

- Advertisement -
येत्या 3 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात काँग्रेसकडून जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण, उत्तर महाराष्ट्र बाळासाहेब थोरात मराठवाडा अशोक चव्हाण, पश्चिम विदर्भ विजय वडट्टेवार आणि पूर्व विदर्भात मी आणि कोकणात आम्ही सर्वजण मिळून एकाच दिवशी त्या भागामध्ये दोन दोन दिवसाचे दौरे कोकणामध्ये करणार आहोत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगप्रकरणी मिळालेल्या दिलास्यावर भाष्य केले.
नाना पटोले म्हणाले की, सत्तेच्या भरवश्यावर काहीही होऊ शकते. रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू होती, तेव्हा त्यांनी फोन टॅपिंग केले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दखल झाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाले आणि रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगप्रकरणी क्लिनचीट देण्यात आली. मग हे प्रकरण सीबीआय सोपविण्यात आले. सीबीआयने भाजपाप्रमाणे त्यांच्या वॉशिंग मशीन फोन टॅपिंग प्रकरण धुतले, न्यायालयात क्लोजर रिपोर्ट देण्यात आला. न्यायालयानेही तो स्वीकारला. यानंतर आता राज्याच्या राजकारणात तापलेले फोन टॅपिंग प्रकरण पूर्णपणे बंद झाले आहे. परंतु माझे नाही एकनाथ खडसेंचे फोन टॅपिंग झाले होते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कधी तरी फाईल उघडेल. आज क्लिनचीट मिळाली असली तरी भविष्यात आम्ही फाईल उघडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -