घरताज्या घडामोडीआणखी एका केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात सक्रीय, रडारवर कोणता नेता ?

आणखी एका केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात सक्रीय, रडारवर कोणता नेता ?

Subscribe

केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे कारवायांचे सत्र संपत नसतानाच आता आणखी एका विभागाने यामध्ये उडी घेतली आहे. अंमलबजावणी संचलानालय (ED), आयकर विभाग (IT) या विभागांसोबतच आता मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (MCA) ची यामध्ये भर पडली आहे. एमसीएमार्फत आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामागे चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. त्यासोबतच शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील नेते यशवंत जाधव यांचीही चौकशी ईडीमार्फत सुरू आहे.

हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात पुण्यातील एक साखर कारखान्याची चौकशी एमसीएमार्फत सुरू आहे. मुश्रीफ कुटुंबीय संचालक असलेल्या साखर कारखान्याच्या चौकशीला सुरूवात झाली आहे. तर सहा कंपन्यांशी कनेक्शन आढळल्याने यशवंत जाधव यांची चौकशी सुरू आहे. बोगस कारभार आणि अनियमितता आढळल्यानेच या दोन्ही प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. कंपनी कायद्यान्वये या दोन्ही प्रकरणात चौकशी सुरू आहे. याआधी एमसीएकडून मुंबई पोलिसात सहा कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ही प्रकरणे आहेत. एका वाहनाच्या माध्यमातून पैशांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा अंदाज एमसीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात पुण्यातील सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना लिमिटेडचे नियंत्रण मुश्रीफ कुटुंबीयांकडून करण्यात येते. साखर कारखाना चालवताना कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे नियम डावलण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे. तसेच संपुर्ण कामकाजात गैरव्यवहार आणि अनियमितताही आढळल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रजत कंझ्युमर्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २०१२-१३ मध्ये शेअरहोल्डर झाली. कंपनीने १.१८ कोटींचे शेअर्स हे १० रूपयांनी खरेदी केले. पण कंपनीने दाखवलेल्या आकडेवारीतून ४.३३ लाख इतका महसूल मिळाल्याचे आढळले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -