घरपालघरपालघर जिल्ह्यात सर्वप्रथम प्लास्टिक पिशव्यामुक्त गावातच प्लास्टिकचा वापर

पालघर जिल्ह्यात सर्वप्रथम प्लास्टिक पिशव्यामुक्त गावातच प्लास्टिकचा वापर

Subscribe

पालघर जिल्ह्यातील उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदीबाबत कडक निर्बंध लावून सर्वप्रथम प्लास्टिकमुक्त सफाळे गाव म्हणून ओळख निर्माण केली होती.

पालघर जिल्ह्यात सर्वप्रथम प्लास्टिक पिशव्यामुक्त गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफाळे भागातील बाजारपेठेत पहाटे दोन वाजता भरणाऱ्या बाजारात तसेच अन्य भाजीपाला व फळविक्रेते व काही दुकानदारांपर्यंत सर्वच नियम पायदळी तुडवत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करत आहेत. राज्य शासनाकडून प्लास्टिक बंदीचे नियम लागू केल्यानंतर काही काळ त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यातील उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायतीने प्लास्टिक बंदीबाबत कडक निर्बंध लावून सर्वप्रथम प्लास्टिकमुक्त सफाळे गाव म्हणून ओळख निर्माण केली होती. त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद होऊन कापडी पिशव्या प्रत्येक विक्रेते व ग्राहकांच्या हाती दिसून येत होत्या.

परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यासाठी आम्ही वेळोवेळी कारवाईसह जनजागृतीही केली. मात्र काही ठिकाणी आजही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची माहिती मिळत असून नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर त्वरित दंडात्मक कारवाई केली जाईल.
– बाबुराव पाटील, ग्रामविकास अधिकारी, उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायत

- Advertisement -

मात्र मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आता पुन्हा सगळीकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा खुलेआम वापर होत असल्याचे दिसून येत आहे. पहाटे दोन वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत भाजीपाला, फळ विक्रेते व काही दुकानदार सर्रासपणे नियम मोडत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसून येत आहे. शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असूनही या पिशव्यांचा सगळीकडे सहजरित्या वापर केला जात आहे. त्यामुळे शासनाने घातलेले निर्बंध खुद्द प्लास्टिकमुक्त गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सफाळे भागात फक्त कागदावरच राहिले की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा –

शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड पक्ष, मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सज्ज व्हा – देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -