घरदेश-विदेशचंद्राबाबूंचे स्वप्नभंग; आता मुख्यमंत्री पदही धोक्यात

चंद्राबाबूंचे स्वप्नभंग; आता मुख्यमंत्री पदही धोक्यात

Subscribe

देशात तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे स्वप्नभंग होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशमध्ये फक्त दोन जागांवर टीडीएस पक्ष आघाडीवर आहे. तर विधानसभेच्या फक्त २५ जागांवर टीडीएस पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे चंद्राबाबूंचे मुख्यमंत्री पदही धोक्यात आले आहे.

तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना मोठा झटका लागण्याची शक्यता आहे. या झटक्यात त्यांचे मुख्यमंत्री पदही धोक्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चंद्रबाबूंना मोठा पराभवाचा सामना करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थावरुन मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशमध्ये टीडीएस २५ पैकी फक्त २ जागांवर आघाडीवर दिसत आहे. याशिवाय, आज आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचाही निकाल जाहीर होमार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी १७५ जागांपैकी फक्त २९ जागांवर आघाडीवर आहे.

जगनमोहन रेड्डींचा पक्ष प्रचंड आघाडीवर

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यासाठी संपूर्ण देशभरात मतमोजनी सुरु आहे. यासोबतच आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची देखील मतमोजनी सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून समोर आलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश विधानसभेच्या १७५ जागांपैकी जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष १४५ जागांवर आघाडीवर आहे. तर टीडीएस फक्त २५ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे चंद्राबाबू यांना मोठा झटका लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

चंद्राबाबूंचे स्वप्नभंग?

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर देशात तिसऱ्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न चंद्राबाबू पाहत होते. परंतु, निकालाच्या आकडेवाडीनुसार चंद्राबाबूंचे स्वप्न कुठेतरी भंग होण्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -