घरमहाराष्ट्रनवनीत राणा विरुद्ध अडसूळ 'कट टू कट' फाईट!

नवनीत राणा विरुद्ध अडसूळ ‘कट टू कट’ फाईट!

Subscribe

लोकसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली आहे. राज्यासह देशभरात भाजपला बहुतांश जागांवर आघाडी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र राज्यातील काही मतदारसंघांमध्ये युतीला धक्का बसण्याची चिन्ह पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी अगदी कट टू कट फाईट या उमेदवारांमध्ये होत आहे. अमरावतीच्या मतदारसंघात अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. येथील युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा या १ लाख ६१ हजार ३१७ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर असल्या तरीही शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे आघाडी घेत १ लाख ७१ हजार ३४९ मतांवर आहेत. दोघांच्या मतांमध्ये केवळ १० हजार मतांचा फरक आहे. त्यामुळे नवनीत राणा या काही मतांच्या फरकाने मागे असून आघाडी घेऊ शकतात असे राजकीय विश्लेषक सांगतात.

आघाडीकडून लढल्या नवनीत राणा 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत आमदार रवी राणा सहभागी झाले. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला राष्ट्रवादीकडील अमरावतीची जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीच्या जागेवर रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

Election Results Nashik Live : उत्तर महाराष्ट्रात ८ पैकी ६ ठिकाणी भाजपची स्पष्ट आगेकूच

Maharashtra LokSabha Results : औरंगाबादमध्ये धक्कादायक कल; एमआयएमचे जलील आघाडीवर; खैरे पिछाडीवर

- Advertisement -

Election Results Mumbai Live : भाजपचे गोपाळ शेट्टी 47 हजार मतांनी आघाडीवर, उर्मिला मातोंडकर पिछाडीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -