घरदेश-विदेशChandrayaan-3: इस्रोने जारी केली चांद्रयान-३ मिशनच्या कमांड सेंटरची छायाचित्रं

Chandrayaan-3: इस्रोने जारी केली चांद्रयान-३ मिशनच्या कमांड सेंटरची छायाचित्रं

Subscribe

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी अवघी काही मिनिटं बाकी आहेत. बुधवारी संध्याकाळी 06.04 वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेचे निरीक्षण करणाऱ्या टीमची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. इस्रोने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये हे मिशन यशस्वी करण्यासाठी वैज्ञानिक मेहनत घेत असल्याचे दिसून येतं आहे.

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्यासाठी अवघी काही मिनिटं बाकी आहेत. बुधवारी संध्याकाळी 06.04 वाजता लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतीय अंतराळ संस्था इस्रोने चांद्रयान-३ मोहिमेचे निरीक्षण करणाऱ्या टीमची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. इस्रोने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये हे मिशन यशस्वी करण्यासाठी वैज्ञानिक मेहनत घेत असल्याचे दिसून येतं आहे. (Chandrayaan 3 ISRO released pictures of Chandrayaan-3 missions command center ISRO )

कमांड सेंटर टीम लँडर मॉड्युल नियुक्त केलेल्या ठिकाणी आणण्यासाठी काम करत आहे. ऑटोमेटेड लँडिंग सिक्वेन्स (एएलएस) सुरू करण्यासाठी सर्व तयार आहेत. लँडर मॉड्यूल (एलएम) नियुक्त बिंदूवर सुमारे 17:44 वाजता येण्याची वाट पाहत आहे,” इस्रोने X (ट्विटर) वर ट्विट केलं आहे

- Advertisement -

लँडिंगचे थेट प्रक्षेपण 5.20 मिनिटांनी सुरू होईल

इस्रोने पुढे म्हटले आहे की, “आदेश मिळाल्यानंतर स्वयंचलित लँडिंग थ्रोटलेबल करण्यायोग्य इंजिन सक्रिय करणार आहे. मिशनला स्वयंचलित करणारी टीम प्राप्त झालेल्या सर्व कमांडची पुष्टी करून लँडिंग सुरू ठेवणार आहे. चांद्रयान-3 मिशन ऑपरेशनचे थेट प्रक्षेपण 05:20 वाजता सुरू होणार आहे.

( हेही वाचा: चांद्रयान-3 यशस्वी होणारच, पण ‘या’ व्यक्तीचा विसर पडता कामा नये; आर माधवनची पोस्ट चर्चेत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -