Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayan 3 चा चंद्रावर फेरफटका; प्रवास करताना सोडणार भारताच्या 'या' खुणा

Chandrayan 3 चा चंद्रावर फेरफटका; प्रवास करताना सोडणार भारताच्या ‘या’ खुणा

Subscribe

Chandrayan 3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील चांद्रयान-3 (Chandrayan 3) चे विक्रम लँडर बुधवारी (23 ऑगस्ट) संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. यासह भारत असा पराक्रम करणारा जगातील चौथा देश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. लँडिंगनंतर सुमारे 4 तासांनी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर चालू लागले, अशी इस्रोने गुरुवारी ट्वीट करताना दिली होती. त्यानंतर इस्रोने आज (25 ऑगस्ट) आणखी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रज्ञान रोव्हर फेरफटका मारताना भारताची छाप सोडताना दिसत आहे. (Chandrayan 3 walk on the moon Indias this marks will be left while travelling)

हेही वाचा – Chandrayaan-3 : ब्रिटिश पत्रकारांची डोकी फिरली…, चांद्रयान-3 च्या यशावर उपस्थित केले प्रश्न

- Advertisement -

इस्रोने ट्वीट करताना लँडरमधून बाहेर पडणाऱ्या रोव्हरचा तो क्षण इमेजर कॅमेराने टीपला आहे, असा मजकूर टाकत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये विक्रम लँडरवर असलेल्या कॅमेरातून लँडरमधून प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी तयार केलेल्या रॅम्पवरुन खाली उतरताना दिसत आहे. हे रोव्हर चंद्रावर उतरताना त्याची सावलीही अगदी स्पष्ट दिसत आहे. या रोव्हरच्या चाकांवर असलेला ‘इस्रो’चा लोगो आणि भारतीय राजमुद्राही व्हिडीओत स्पष्टपणे दिसते आहे. रोव्हरच्या डाव्या चाकावर ‘इस्रो’चा लोगो असून उजव्या चाकावर भारतीय राजमुद्रा आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी रोव्हरची रचना अशा प्रकारे केली आहे की, चे चंद्रावर जिथे जाईल तिथे ते अशोक चक्राची छाप सोडणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Brics Summit Council : लडाखमधील LACबाबत मोदींकडून चिंता व्यक्त; चीनी सैन्य लवकरच घेणार माघार?

इस्रोच्या मोहिमेतून भारतासोबत जगाला काय मिळणार?

विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर काही तासातच प्रज्ञान रोव्हर विक्रममधून बाहेर आले आणि आपले काम करण्यास सुरूवात केली आहे. रोव्हर त्याठिकाणाहून छायाचित्रे पाठवत आहे. विशेष म्हणजे इस्रोने रोव्हरची रचना अशा प्रकारे केली आहे की, ते चंद्राच्या दक्षिणेकडील अशा गोष्टींचा शोध घेईल, जे केवळ भारतासाठीच नाही तर जगातील सर्व देशांसाठी उपयुक्त ठरेल. जेणेकरून चंद्रावर अनेक प्रकारचे संशोधन केले जाऊ शकते. भारताचे ही मोहिम विशेष आहे, कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर कोणीही पोहोचले नाही. त्यामुळे या भागात काय आहे हे कोणालाच माहीत नाही. चंद्रावर उतरलेले रोव्हर 14 दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भटकंती करताना वेगवेगळे प्रयोग करणार आहे. रोव्हर चंद्रावरील मातीचे नमुने तपासणे, फोटो काढणे यासारख्या गोष्टी करणार आहे.

- Advertisment -