घरदेश-विदेशकाँग्रेसच्या राजवटीत दोन राज्यांइतकी जमीन चीन-पाकने हडपली; भाजपचा आरोप

काँग्रेसच्या राजवटीत दोन राज्यांइतकी जमीन चीन-पाकने हडपली; भाजपचा आरोप

Subscribe

चीन वादाच्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधक आणि देश सरकारबरोबर उभा आहे, परंतु केवळ एकाच कुटुंबाला अडचण होत आहे, अशी टीका जेपी नड्डा यांनी केली आहे.

भारत आणि चीनच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये युद्ध सुरू आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बुधवारी सकाळी ट्वीट करून कॉंग्रेस पक्षावर प्रश्न उपस्थित केले. आता भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळात पाकिस्तान-चीनने बरीच जमीन हडपली, असा आरोप भाजपने केला आहे.

पत्रकार परिषदेत संबित पात्रा म्हणाले की, सत्तेत असताना कॉंग्रेस पक्षाने ऐतिहासिक चुका केल्या आहेत. संपूर्ण देश एका कुटुंबाच्या चुका सहन करीत आहे. चीनच्या मुद्द्यावर कॉंग्रेसचा दृष्टीकोन नरम का आहे? असा सवाल संबित पात्रा यांनी केला आहे. संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, संसदेत चीन, पाकिस्तानवर अनेकदा प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा प्रश्न २०१२ मध्ये विचारला गेला होता, जेव्हा कॉंग्रेस सरकारने उत्तर दिले होते की पाकिस्तान-चीनने भारताचे ७८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र हडपलं आहे. जम्मू-काश्मीरमधील हजाराहून अधिक किमी अंतर जमीन चीननेही ताब्यात घेतली आहे.

- Advertisement -

चीनने आधीच भारताची जमीन ताब्यात घेतली आहे, त्याशिवाय पाकिस्तानने पीओकेची जमीनही चीनच्या ताब्यात दिली होती, असं भाजपच्या नेत्याने म्हटलं. संबित पात्रा म्हणाले की, कॉंग्रेस पक्षातील आई-मुलाने देशात संभ्रम पसरविला आहे. खरतर, काँग्रेस सरकारच्या काळात पाकिस्तान आणि चीनने भारताच्या दोन राज्यांइतकी जमीन ताब्यात घेतली आहे. आमचा प्रश्न आहे की कॉंग्रेस सरकारने ही जमीन का दिली? १९६२ च्या युद्धामध्ये सैनिकांना योग्य वेळी इशारा देण्यात आला नव्हता असा आरोप भाजप नेत्यांनी केला.


हेही वाचा – गोपीचंद पडळकर सडक्या मानसिकतेचा कीडा – महेश तपासे

- Advertisement -

जेपी नड्डा यांनी बुधवारी अनेक ट्विट करत काँग्रेसवर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. चीन वादाच्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधक आणि देश सरकारबरोबर उभा आहे, परंतु केवळ एकाच कुटुंबाला अडचण होत आहे. कॉंग्रेस पक्ष कुटूंबाला देश मानू लागला आहे, असं भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -